Breaking News यवतमाळ सामाजिक

*ग्रामीण पोलिसांची गावठी दारू भट्टीवर धाड*,

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सावर बीट मधिल एकास रंगेहाथ पकडण्यात आले असल्याने अनेक दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे येथील अशोक गुलाबराव दिघाडे वय 55 वर्ष राहणार सावर हा अवैद्यरित्या मोहमास दारू गाळप करीत असल्याचा माहिती वरून सावर बीट येथील शेत शिवारातील आळ नदीच्या परिसरात सापळा रचून धाड टाकण्यात आली असता आरोपी अशोक गुलाब दिघाडे वय 55 वर्ष राहणार सावर तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ हा आड नदीच्या पात्राच्या काठी जंगलामध्ये गावरान चालु हातभट्टी चालवून मोहामा चाची दारू काढत असताना मिळून आला. सदर कारवाईदरम्यान गावरान हातभट्टी साठी वापरले जाणारे 40 पिपे मोहामाच सडवा प्रत्येकी 15 ली क्षमते च्या पीत्यात कि अं. 30,000/-₹, 40 टीनाचे पीपे प्रत्येकी 15 रुपये प्रमाणे 600/- रुपये, 200 लिटर क्षमतेचा लोखंडी ड्रम की.अ. 1000/-₹, 40 लिटर गावरान हातभट्टी दारू की.8000/-₹ व दारू काढण्याचे इतर साहित्य किं. 500/-₹ असा एकूण 40100/-₹ चा मुद्देमाल पांचासमक्ष ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला असून आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील ,मा.अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे
उपविभगीय पोलीस अधिकारी यवतमाळ संपतराव भोसले , पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यवतमाळ ग्रामीण यांचे मार्गदर्शनात पो.उपनिरिक्षक अमोल ढोकणे,पो.हे.का. मातकर, पो.काॅ. संजय राठोड, पो.काॅ. सचिन पातकमवार,पो.काॅ. रुपेश नेवारे यांनी केली.

Copyright ©