महाराष्ट्र राजकीय सामाजिक

*नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान* *आ. मदनभाऊ येरावार 

 

यवतमाळ दि. 28 प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देतानाही नियमित कर्जफेड करणाऱ्या बळीराजाला ५० हजार रु. पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेऊन, राज्यातील १४ लाख शेतकरी कुटुंबाना दिलासा दिल्याबद्दल भाजप आमदार मदनभाऊ येरावार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याचे आश्वासन देऊनही, महाविकास आघाडी सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असे आ. येरावार. यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या सहा हजार कोटींच्या कर्जाचा बोजा हलका होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे त्यांनी प्रसिद्धी पञकात म्हटले आहे. २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यालादेखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल आमदार येरावार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील ब्रह्मगव्हाण, वाघूर आणि भातसा प्रकल्पांसाठी साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर करून कृषी आणि नागरी पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्याच्या निर्णयावरही आ. … यांनी समाधान व्यक्त केले आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्याच्या थंडावलेल्या प्रगतीला शिंदे-फडणवीस सरकारमुळे वेग येत असल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्याची समस्यामुक्ती आणि शहरी भागाचा विकास यांचा योजनापूर्वक समतोल साधणारी युती सरकारची वाटचाल महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

*राजपूत समाजाने तलवारी ऐवजी शिक्षणरुपी शस्त्राला प्राधान्य द्यावे*

*क्षत्रिय राजपूत समाज समितीद्वारा महाराणा प्रतापसिंह जयंती थाटात संपन्न*

यवतमाळ :
दि. 5 प्रतिनिधी
राजपूत समाजाने तलवारीची भाषा सोडून शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे, जेणेकरुन समाज आर्थिक व ज्ञानाने संपन्न होईल.असे मौलिक मार्गदर्शन ॲड. अनिलसिंह ठाकूर पुसद यांनी तर समाजाने गटा-तटाच्या वादात न पडता एकसंघ व्हावे असे प्रतिपादन सुरेशसिंह गहेरवार नागपूर यांनी, येथील क्षत्रिय राजपूत समाज समितीद्वारा आयोजित महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रमात बोलतांना केले.
क्षत्रिय राजपूत समाज समिति यवतमाळ जिल्हाव्दारा निवृत्त अभियंता भवनात,२ जून रोजी, महाराणा प्रतापसिंहजी यांच्या 482 व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जयंती दिनी सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील अनेक तरुण- तरुणी व प्रौढांनी रॅलीत सहभाग घेतला होता. ही रॅली शहरातील विविध भागात भ्रमण करताना महाराणाजींच्या नावाचा जयघोष करीत, परत अभियंता भवनात रॅलीचा समारोप झाला.त्यानंतर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमात उपस्थित अतिथींनी महान योध्दा हिन्दुह्रदय सम्राट महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य प्रतिमेला हारार्पण करून पुजन केले. कु. वैदेही चौहानच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्यअतिथी ॲड. अनिलसिंह ठाकूर पुसद यांनी आपल्या भाषणात सांगितले की,आता राजपूत समाजाने तलवारीऐवजी आपल्या पाल्यांना उच्चशिक्षण देवून परिवाराचा, समाजाचा व देशाच्या विकासाला प्राधान्य द्यावे. प्रत्यक्ष तलवारीपेक्षा ज्ञानरुपी तलवारी जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडवू शकते. यावेळी राजपूत चेतना मंच नागपूरचे अध्यक्ष सुरेशसिंह गहेरवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजपूत समाजाने गटा-तटांना‍ तिलांजली देत ,समाज व सर्व संघटनांनी एकत्र येणे काळाची गरज असून, समाजाच्या सार्वत्रिक विकासासाठी शिक्षणावर अधिक भर देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. कार्यक्रमाला राजपूत चेतना मंच नागपुर चे सामुहिक विवाह मेळाव्याचे प्रमुख महावीरसिंह बैस,रणजीतसिंह भारद्वाज, भारतसिंह बैस, चंद्रकांतसिंह चंदेल सर्व नागपुर प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात क्षत्रिय राजपूत समाज समितीचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार रघुवीरसिंह चौहान यांनी संघटनेच्या मागील तीस वर्षाच्या वाटचालीचा धावता आढावा घेत अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमा दरम्यान कु. वैदेही मनोजसिंह चौहान या बालिकेने राजपुती घुमरनृत्यासह विविध प्रकारचे कलाप्रदर्शन सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्याबद्दल वैदेहीचे उपस्थितांनी कौतुक करीत अतिथींनी तिचे स्वागत केले. यावेळी शौर्यसिंह चौहान, स्वयं सूर्यवंशी, दर्शन सूर्यवंशी, तनीष चौहान या बालकांनीही कलेचे प्रदर्शन करुन वाहवा मिळविली. प्रारंभी समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी अतिथींचा शाल – पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन समितीचे सचिव डी.पी. सिंह यांनी केले. तर
महेंद्र प्रतापसिंह भदोरिया यांनी आभार प्रदर्शन केले. समितीचे उपाध्यक्ष विजयसिंह सेंगर, दिनेशसिंह गहेरवार, सहसचिव नरेंद्रसिंह सेंगर, ॲड. अप्रेशसिंह खतवार, कोषाध्यक्ष निश्चलसिंह गौर, गणेशसिंह कछवाह, डॉ. गोपालसिंह गौर, रघुवीरसिंह बैस,‍ कैलाशसिंह बैस, योगेशसिंह बिसेन, पंचमसिंह सदस्वार, संतोषसिंह चौहान, हंसराजसिंह सोमवंशी, ज्वालासिंह सरस्वार, बाबुसिंह चौहान, मनोजसिंह चौहान, मुन्नासिंह गहेरवार, संतोषसिंह गौर, निलजसिंह चौहान, प्रतिकसिंह चौहान, हिरासिंह चौहान, अभयसिंह राठौर, नरेंद्रसिंह चंदेल, दुर्गासिंह गहेरवार, उदयसिंह सोमवंशी यांच्यासह राजपूत समाजातील अनेक पुरूष व महिला, मुले मोठया संरव्येने उपस्थित होते.

Copyright ©