यवतमाळ सामाजिक

*मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटनेच्या वतीने दिग्रस तहसील कार्यालयात स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण*

 

 

यंदा स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने सर्वत्र स्वातंत्र्ययाचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे. याच निमित्ताने दिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे.

केंद्र शासनाने देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने दिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक कक्षाजवळ तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे, दस्तलेखक संघाचे अध्यक्ष सुनिल हिरास, संजय ढगे, दीपक साळुंके, मनीष भलगे, गजानन चौधरी,पत्रकार सदानंद जाधव,अधिरथ आमटे व तहसील कार्यालयात आलेले अनेक नागरिक उपस्थित होते.

Copyright ©