Breaking News यवतमाळ सामाजिक

*दस्तऐवजावर खोडतोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी*

 

घाटंजी. प्रतिनिधी
(अमोल नडपेलवार)

काही वर्षांपूर्वी घाटंजी येथील केशव नागरी पतसंस्थेकडून घरासाठी कर्ज घ्यावयाचे असल्यामुळे कर्जाचे गहाण खत दुय्यम निबंधक कार्यालय घाटंजी येथे नोंदणी केली. सदर गहान खतामध्ये सहाय्यक निबंधक यांच्या व्यतिरिक्त कोणालाही खोडतोड करता येत नाही. मात्र स्थानिक पतसंस्थेने त्यांच्या सोयीप्रमाणे खोडतोड करून लाभार्थ्याकडून अव्याजवी व्याज आकारण्याचा पतसंस्थेचा मानस असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी गटलेवार यांनी पोलीस स्टेशन व सहाय्यक निबंधक कार्यालय घाटंजी यांना पत्राद्वारे केली असल्याची माहिती स्वतः दत्ताजी गटलेवार यांनी पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांना दिली.

सविस्तर असे की, काही वर्षांपूर्वी दत्ताजी गटलेवार यांनी केशव नागरी पतसंस्था कडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा हप्ता ते नियमित भरत होते. मात्र कोरोना महामारी मध्ये लॉकडाऊन लागल्याने व्यवसाय बंद असल्यामुळे हप्त्याची परतफेड करता आली नाही. एप्रिल 2021 मध्ये कर्ज प्रकरणाची माहिती घेण्यासाठी व मुद्दल रक्कम भरण्यासाठी रीतसर अर्ज त्यांनी पतसंस्थेत दिला होता. मात्र वर्षभरानंतरही त्यांना माहिती मिळाली नाही.

तसेच सदर प्रकरणात त्यांनी दिलेले कर्जाचे गहाण खत दुय्यम निबंध कार्यालय घाटंजी येथे नोंदणी करताना त्यामध्ये संपूर्ण बाबी नमूद करून घेतल्या होत्या. मात्र व्याजाचा रकाना मोकळा ठेवला होता. तेव्हाच त्यांनी त्या रकाण्यात सदर बाबी नोंदवून घेतल्या नाहीत. त्यामुळे सदर गहाण खतात कुठल्याही प्रकारचा व्याजाचा दर, रक्कम व इतर बाबी नसल्यामुळे त्यांनी मला बिनव्याजी कर्ज दिल्याचे स्पष्ट होते. असल्याचे दत्ताजी गटलेवार यांचे म्हणणे आहे.

मात्र नंतर पतसंस्थेने सदर रखाण्यात त्यांच्या सोयीनुसार शासकीय गहाणखतामध्ये खोडतोड करून त्यांच्या मर्जीप्रमाणे माहिती भरण्यात आली. विशेष म्हणजे दुय्यम निबंधक यांच्या सक्षम गहाण खत झाल्यावर कोणालाही त्यामध्ये खोडतोड करण्याचा नियमाने अधिकार नसतो. सदर दस्तायवज शासकीय असल्याने त्यात खोडतोड केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्या करण्याची तरतूद असल्याकारणाने संबंधित पत संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याधिकारी, शाखा व्यवस्थापक याच्यावर जनतेच्या मालमत्तेच्या कागदपत्राचे अपरातफर व खोडतोड झाल्याने त्या पतसंस्थे विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी गटलेवार यांनी केली आहे.

सदर निवेदन मुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार मुख्य सचिव, मुंबई जिल्हाधिकारी यवतमाळ, ठाणेदार पोलीस टेशन घाटंजी, तहसीलदार घाटंजी यांना निवेदनाच्या प्रति पाठविलेल्या आहेत.

तसेच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 22 जुलैला दिलेल्या तक्रारीत सदर पतसंस्थेने गहाण दस्तऐवजावर स्वतःच्या मताने लिहून नियमाचे उल्लंघन केले आहे तसेच सुरक्षा म्हणून दिलेल्या चेकवर आकडा टाकून ते बाउन्स करून माझ्यावर अन्याय केला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून करतानाच माझ्याशिवाय अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याकारणाने संबंधाची चौकशी करून त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून सदर पुरावे दाखवून केली आहे.

Copyright ©