Breaking News महाराष्ट्र शैक्षणिक सामाजिक

*पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा*

 

*मदतीचे आवाहन : पूरग्रस्त भागातील शाळकरी विद्यार्थ्यांनसाठी वह्या ,दप्तर ,पेन ,पेन्सिल असं शालेयसाहित्य देण्याची नम्र विनंती*.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांच्या शेतीच नुकसान केल आहे जिल्ह्याच्या वणी ,राळेगाव आणि मारेगाव या तीन तालुक्यात तर लाखो हेक्टर वरील पीक पुरात उध्वस्त झाले , जमीन खरडून गेली नदी नाल्याकाठी राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि घरातील जीवनावश्यक वस्तू सह अन्नधान्यही पुरात वाहून गेले शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांचेही मोठ्या नुकसान पुराने झालेलं आहे शाळाकरी विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तकं ही सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे खराब झाले आणि त्यामुळे या सर्वांना मोठी झळ बसली आहे. ही परिस्थिती त्या भागात पत्रकार म्हणून जाऊन पाहिली आता
आम्ही शाळकरी विद्यार्थ्यांना आमच्या कडून नक्कीच एक सामाजिक दायित्वातुन शालेयवस्तू ज्यात वह्या, दप्तर ,पेन्सिल ,पेन्सिल देतोय आपणही या शाळकरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी ठरेल असं मदतीचे योगदान द्यावं यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे आणि त्यामुळे यासाठी आपण सर्व महानुभाव मान्यवरांनी बांधवांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर आणि वह्या ,पेन ,पेन्सिल आदी मदत करावी त्यामुळे आधार मिळेल जेणे करून वणी ,राळेगाव मारेगाव या तालुक्यातल्या पूरग्रस्त भागातील मुलांना त्यांच्या घरपोच या वह्या आणि दप्तर हे दिल्या जातील यासाठी आपण सढळ हाताने वस्तू स्वरूपात मदत करावी ही नम्र विनंती.
आपण सर्व बांधवांनी दिनांक 5 ऑगस्ट 2022 पर्यंत खालील मोबाईल क्रमांक वर संपर्क करून मदत देऊ शकता .
*कुठल्याही प्रकारची आर्थिक किंवा रोख स्वरूपातील मदत स्वीकारली जाणार नाही* शालेय उपयोगी साहित्य दप्तर ,वह्या ,पेन ,पेन्सिल आदी वस्तू द्याव्यात
आपल्या कडील वस्तू संबंधित गावात नक्कीच पोहोचवल्या जातील आणि त्याच्या माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी सांगितली जाईल तरी कृपया आपण या आपल्या कार्याला सहकार्य करावे ही विनंती.

संपर्क :
1) कपिल श्यामकुवर : यवतमाळ
मो. 7774037507

2) आकाश बुर्रेवार : घाटंजी
मो .98344 36670

3) मनीष काळे : राळेगाव
मो. 99219 29277

4) ज्योतीबा पोटे : मारेगाव
मो. 97637 50774

5) Adv .सुरज महारतळे : वणी
मो . 8793602331

6) स्वप्नील वाटाणे : राळेगाव
मो . 87668 41315

Copyright ©