यवतमाळ सामाजिक

*तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात आज विदर्भ स्तरीय भव्य भक्ती गीत स्पर्धेचे आयोजन*

 

प्रतिनिधी,यवतमाळ
यवतमाळ – देवजी निसर जैन धर्मस्थानक राजेंद्र नगर यवतमाळ येथे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी म. सा. यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि. 28 जुलै रोजी सकाळी 6.15 ते 7 प्रार्थना तद्नंतर नवकार मंत्र जप गुरुदेव आनंद चालीसा पठण तसेच तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा. यांचे श्रमण सुर्य ऋषी आनंद या विषयावर प्रवचन तसेच सामाईक बेला दिवस तसेच रात्री भोजन त्याग या अनुषंगाने भव्य प्रवचन व विविध स्पर्धांचेे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. 28 जुलै विदर्भ स्तरीय सामुहिक भक्तीगीत प्रतियोगिताचे दुपारी 1 ते 4 या वेळेत देवजी निसर जैन धर्म स्थानकात आयोजन करण्यात आले असून या स्पर्धाचे प्रथम पुरस्कार 11001 व मोमेन्टो, द्विती पुरस्कार 9001 व मोमेन्टो, तृतीय पुरस्कार 7001 व मोमेन्टो, चतुर्थ पुरस्कार 5001 व मोमेन्टो, पाचवे पुरस्कार 3001 व मोमेन्टो स्व. कचरुलालजी बरलोटा यांच्या स्मृती निमित्त श्रीमती शोभादेवी बरलोटा परिवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे. भक्तीगीत स्पर्धेकरिता ड्रेस कोड तसेच गुरुस्तुती यावर भक्तीगीत प्रस्तुत करावयाचे आहे. या भक्तीगीत स्पर्धेकरिता विदर्भातील सकल जैन समाजातील नामवंत भक्ती ग्रुप आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा., मधुर व्याख्यानी अमृत ऋषीजी म. सा., नवदिक्षीत प. पु. गितार्थ ऋषीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद जन्मोत्सवाचे भव्य आयोजन जैन सेवा समिती व आनंद वर्षावास समिती, चातुर्मास समिती यवतमाळ यांनी केले आहे. वरिल सर्व कार्यक्रमाला सकल जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जैन सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश खिवसरा, चातुर्मास समितीचे अध्यक्ष अमरचंद गुगलिया, महामंत्री श्याम भंसाली यांनी केले आहे. या कार्यक्रमाला विदर्भातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

Copyright ©