शैक्षणिक

*सुसंस्कार विद्या मंदिरला डॉ. रणजीत पाटील यांची भेट*

 

विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

यवतमाळ-: सुसंस्कार विद्या मंदिर येथे मा.गृहराज्यमंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.तसेच यांच्या समवेत  राजू पडगिलवार   राजू पडगिलवार  भाजपा जिल्हा संघटन महामंत्री  याप्रसंगी उपस्थित होते.शाळेचे सचिव  के. संजय व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे  उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर डॉ. रणजीत पाटील यांनी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी “शिक्षक हा शाळेचा आधारस्तंभ असतो,शाळा समिती व शिक्षक यांच्या एकोप्याने शाळेचे कार्य सुरळीत चालते” असे सांगत सुसंस्कार विद्या मंदिर च्या व्यवस्था व शिस्तीचे कौतुक केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “पालक व शिक्षकांचा आदर करावा योग्य वर्तन व पुरेसा अभ्यास करून तुम्ही आपल्या आयुष्यात यश संपादन करू शकता” असे विचार त्यांनी मांडले. व सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका वृषाली जोशी यांनी केले या कार्यक्रमास सर्व शिक्षक उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©