यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*न. प. उच्च प्रा. शाळा क्र.२ घाटी येथील मुलींना २५ सायकलीचे वाटप*

घाटंजी :अमोलनड पेलवार
————————————–
घाटंजी:- नगर परिषद घाटी शाळा क्र. २ येथील आठव्या वर्गातील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत २५ सायकलींचे वाटप करण्यात आले.लाभधारक विद्यार्थिनींना सायकल चा सुरक्षित वापर व रस्ते वाहन सुरक्षितता या बद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर तसेच पंचायत समिती येथील श्रीकांत पायथाडे साधनव्यक्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देशमुख काका, उपाध्यक्ष नरेश कुंटलवार. सविता ककण शाळेचे मुख्याध्यापक अरुण पडलवार व पत्रकार कज्जूम कुरेशी. संजय ढवळे यांच्या उपस्थितीत सायकल वाटपाचा कार्यक्रम यशस्वीतेने करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षक गोलर सर, सिडाम सर ,मडावी सर, राठोड सर, बोबडे सर, आणि कु. वृषाली अवचीत, वेणूताई मेश्राम, सोनाली पेटेवार, नारायण डाहाके, इत्यादी या कार्यक्रमा करिता परिश्रम घेतले.

Copyright ©