यवतमाळ सामाजिक

*माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया यांच्या स्वखर्चातून पूरग्रस्तांना मदत*

 

प्रतिनिधी घाटंजी……
माजी आमदार सन्माननीय संदीपभाऊ बाजोरिया यांच्या स्वखर्चातून पूरग्रस्तांना मदत या मोहिमेचा लाभ आज माझ्या गावातील (सायखेडा बू.) या गावातील सिमा सूरपाम या महिलेला मिळाला. 5 दिवसा आधी या महिलेच्या पतीचा विद्युत शॉक मुले दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दीपक भाऊ धात्रक यांनी सायखेडा येथे येऊन त्या कुटुंबाला भेट देऊन धीर दिला आणि त्यांना आर्थिक मदत केली.
यावेळी यवतमाळ शहर सचिव किशोर भाऊ चव्हाण, प्रफुल भाऊ देशमुख, अस्लम भाऊ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अमर ठाकरे, युवक जिल्हा सरचिटणीस प्रज्वल भुरके, तालुका उपाध्यक्ष निसार भाऊ शेख, रोहन झामरे, वैभव भरणे, रामचंद्र मंगाम, राहुल कनाके, मोरेश्वर लोखंडे शब्बीर शेख, निलेश करपते, विनायक मेश्राम आणि अनेक गावकरी उपस्थित होते..

Copyright ©