यवतमाळ सामाजिक

दहेली ग्रामपंचायत अंतर्गत मुख्य रस्त्याची दूर्दशा

दहेली ग्रामपंचायत अंतर्गत मुख्य रस्त्याची दूर्दशा

(ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष)

(सरपंच व सचिवांची बघायची भूमिका)
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील दहेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा कायम असून,नागरिकांना तथा विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे, मागील दहा ते पंधरा दिवसापासून चालू असलेल्या संतधर पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून,वाहनधारकांना या रस्त्याने येता जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे,सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी दहेली येथील नागरिकांनी केली आहे,निवडणुकीच्या काळात फक्त आश्वासने दिली जातात,मात्र प्रत्यक्षात गावातील समस्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी खंत गावातील नागरिकांनी व्यक्त केली,ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्याकडे प्रचंड दुर्लक्ष केले आहे असा आरोप दहली येथील नागरिकांनी केला आहे,सावळी सदोबा परिसरातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याची चाळण झालेली आहेत,ग्रामपंचायत प्रशासनाचे कायम दुर्लक्ष असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Copyright ©