महाराष्ट्र शैक्षणिक

*बळीराम पाटील महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न*

 

किनवट प्रतिनिधी-
बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन *पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा* दिनांक २२ जुलै २०२२ रोजी सकाळी ११:००वाजता संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार हे होते.प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते डी.एम.तपासकर उपविभागीय कृषी आधिकारी साहेब यांच्या हस्ते *पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा* संपन्न झाला.प्रसंगी मंचावर किनवट शिक्षण संस्था किनवट चे सनमानिय सदस्य तथा माजी प्राचार्य वि.मा.शिंदे, प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर, परीक्षा प्रमुख प्रा.राजकुमार नेम्मानीवार,उपस्थित होते.
स्वर्गीय बळीराम पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर कु.श्रध्दा भवरे व अंकीता तक्कलवार विद्यार्थीनी ने विद्यापीठ गीत गायले.मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख प्रा.आर.एम.नेम्मानीवार यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलतांना म्हनाले की महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. हा क्षण विद्यार्थाचा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.
पदवी प्रदान विद्यार्थाना मार्गदर्शन करतांना डी.एम.तपासकर म्हनाले शिक्षण हे जीवनमान उंचावण्यासाठी व राष्ट्रीयसेवा करण्यासाठी महत्वाचे आहे.पुढे बोलतांना म्हनाले की शिक्षक पदापासुन देशाच्या प्रथम नागरिक पदा पर्यन्त पोहचणार्या महामहिम द्रौपदी मुर्मु चे उदाहरण देवून विद्यार्थानी अभ्यासुवृत्ती जोपासावी आसे ते म्हनाले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप किनवट शिक्षण संस्था किनवट चे उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार यांनी केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हनाले की विदयार्थानी देशभक्त होवून मातृभूमी ची सेवा करावी.व मानवतेचे पूजारी व्हावे.आसे ते म्हनाले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थाना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. के.बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. जी. एस.वानखेडे, प्रा.राजकुमार नेम्मानीवार, डॉ. पंजाब शेरे,डॉ. शुभांगी दिवे, यांनी मेहनत घेतली.संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेम्मानिवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील,एन.सी.सी. विभाग प्रमुख प्रा. काझी, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने, प्रा. सुलोचना जाधव,डॉ आनंद भालेराव, डॉ. सुरेंद्र शिंदे, डाँ योगेश सोमवंशी प्रा. ममता जोनपेल्लीवार, डॉ. शुभांगी दिवे,डाँ प्रज्ञा घोडवाडीकर,प्रा अम्रपाली हाटकर, डॉ. पंजाब शेरे, प्रा. स्वाती कुरमे, डॉ. रचना हिप्पळगांवकर, डॉ. श्रीनीवास रेड्डी, जय चव्हाण कार्यलयीन अधिक्षक राजेंद्र धात्रक, यमुना कुमरे, दिपक खंदारे , आशा शिरपूरकर, प्रा .राहूलवाड , व्यंकटेश सिरमनवार, पालक विजय राठोड, किशोर वाघमारे, रमेश कांगने,सुधीर पाटील,छत्रपती रिंगणमोडे व महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाँ.सुरेंद्र शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार डॉ. शुभांगी दिवे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीतांनी झाली.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©