यवतमाळ सामाजिक

*आयटक आशा व गटप्रवर्तक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न*

 

*१५ दिवसात थकीत मानधन मिळाले नाहीतर संताप आंदोलन – काँ दिलीप उटाणे*
०१ऑगस्टला यवताम जिल्हा मेळावा*

यवतमाळ – आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेची सभा २१जुलै श्रमशक्ती भवन येथे जिल्हा सचिव वंदना बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर आयटक राज्य उपाध्यक्ष कॉ.दिलीप उटाणे , व अंगणवाडी युनियनच्या जिल्हाध्यक्ष सविता कट्यारमल यांच्या प्रमुख उपस्थित नुकतीच संपन्न झाली
*गटप्रवर्ताकांचे प्रलंबीत प्रश्न व शासनाची भूमिका* स्थानिक प्रश्न व प्रश्न , प्रशासनाकडून मुसकटदाबी , नुकतेच आशा ,गटप्रवर्तक,यांचे थकीत मानधन व इतर प्रश्नावर आरोग्य भवन मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त डॉ रामास्वामी एन यांच्या कक्षात झालेली बैठक इत्यादी सविस्तर मार्गदर्शन करताना आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी *१५ दिवसात मान्य केल्या प्रमाणे थकीत मानधन.भत्ते मिळाले नाहीतर राज्यभर संताप आंदोलन केले जाईल असे सांगितले*
तसेच तेपुढे म्हणाले कोवीड आजारावर मात करण्यासाठी आशा वर्कर अंगणवाडी, गटप्रवर्तक यांनी केलेल्या कामाची दखल घेत दरमहा २५ हजार रुपये मानधन देणार असे स्वतः पंतप्रधान यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत सांगितले त्याप्रमाणे द्यावे केंद्र सरकारने तात्काळ आदेश काढावे अशी मागणी उटाणे यांनी केली
*बैठकीत सुरुवातीला अतिवृष्टीत मृत्यू पावलेले नागरिकांना श्रद्धाजंली वाहून सुवात करण्यात आली

*अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान तर अनेकांच्या घरात पाणी गेले .घर पडले अशा तात्काळ मदत शासनाने द्यावे ठराव कॉ. दिवाकर नागपूरे यांनी मांडला व सर्वानुमते पास करण्यात आला*
आशा वर्कर व गट प्रवर्तक यांच्या आंदोलनाच्या तयारीसाठी जिल्हा मेळावा दि. 1 अॉगस्ट 2022 रोजी श्रम शक्ती भवन यवतमाळ येथे घेण्याचे ठरले यावेळी वैशाली खीरटकर , सुहासिनी भगत ,मैना राऊत , कोकीळा उमरे , लता डाखोरे , सिमा पेंदोर , सुधा मेश्राम , सिमा पाटील , रश्मी वाघ , सुनिता चव्हान , पुंचफुला डाखोरे , चंदा कांबळे , दैवशाला खंदारे , अनिता हाके ,नैना जाधव , राजेश्री वाठोरे , विद्या पाटील , छाया पाटील ,‌ वंदना वाळुकर , आशा बडेराव , राणी राजपल्लु ,रिना कोंडुलवार ,मंजु मुनेश्वर , वणीता चौधरी , सवीता पाझारे. , अश्वीनी वाढई , मंजु कोडापे , रत्नमाला वडस्कर , गायत्री अडपावार , सुलताना शेख ,मंजुषा परचाके , छाया पाटील , सुनिता धोटे ,अरूणा घोडे यावेळी उपस्थीत होत्या अशी माहीती प्रशीध्दी पत्रकाद्वारे काॅ.दिवाकर नागपुरे , जिल्हा सचिव,
आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यवतमाळ यांनी दिली आहे

Copyright ©