Breaking News यवतमाळ सामाजिक

तालुक्यातील सर्व तलाठी सज्या कार्यालयात अखेर लावले उपस्थितीबाबत फलक

तालुक्यातील सर्व तलाठी सज्या कार्यालयात अखेर लावले उपस्थितीबाबत फलक

कमांडो गौतम धवने यांच्या प्रयत्नाला आले यश

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी उपस्थितीबाबत सज्यावरील बोर्ड लावण्याबाबत कमांडो गौतम धवने यांनी १४ जूनला २०२२ ला जिल्हाधिकाऱ्याला महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेले आपले सरकार पोर्टल यावर तक्रार दिली असता कमांडो धवने यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना आदेश जारी केले.

त्याअनुषंगाने दिग्रस तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी हा मुद्दा गांभीर्याने लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी सज्यावरील बोर्ड लावण्याबाबत आदेश जारी केले. त्यानूसार तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी सज्यावरील बोर्ड लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये दिग्रस, सिंगद, निंभा, महागाव व मोख या गावी बोर्ड लावण्यात आले. कमांडो गौतम धवने हे देशसेवा बरोबरच सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी, गावातील समस्या सोडविणे, अन्याय विरुद्ध लढणे, या बाबत त्यांची भूमिका खूप मोठी आहे. कमांडो धवने यांच्या नक्षल भागातील चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारचे मेडल, गृहमंत्रालय दिल्ली चे प्रशस्तीपत्र, पोलीस महासंचालक झारखंड प्रशस्तीपत्र व अनेक प्रशस्तीपत्र ने सन्मानित आहे.

–चौकट —

– तालुक्यातील सर्व तलाठी सज्यावरील उपस्थितीबाबत बोर्ड लावले असता गावातील लोकांना दिलासा मिळणार व दिलेल्या दिवसामध्ये तलाठी कार्यालयामध्ये हजर राहिल्यामुळे भेटणे सोपे होणार. माझ्या या मागणीला सहकार्य केल्याबद्दल मी दिग्रसचे तहसीलदार साहेब व दिग्रस तालुक्यातील सर्व तलाठी साहेब यांचा आभार व्यक्त करतो —
गौतम धवने, कमांडो

Copyright ©