महाराष्ट्र सामाजिक

सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते वृक्षारोपण

सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते वृक्षारोपण

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या १४ व्या वर्धापण दिना निमित्त  बळीराम पाटील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट येथे वृक्षारोपण समारोह घेण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक रुपेश दलाल यांनी केली होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा.कीर्तीकिरण एच. पूजार हे होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथींचे सत्कार करण्यात आले
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच. पूजार यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या गौरवशाली वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या व वृक्षारोपण उपक्रमा बद्दल कौतुकही केले आणि आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा यांची माहिती दिली.
तर रुपेश दलाल यांनी बँकेच्या कारकीर्दी बद्दल माहीती सांगीतली त्यांनी म्हटले सोळा जिल्ह्यात एम जी बी शाखा कार्यरत आहे या बँकेद्वारे गृहकर्ज,शैक्षणिक कर्ज,व्यवसायिक कर्ज ,विमा योजना या दिल्या जातात.
यानंतर महाविद्यालयीन परिसरात  मा.पूजार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर,उप प्राचार्य डॉ. गजानन वानखेडे,सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आनंद भंडारे,प्रा.द्वारकाप्रसाद वायाळ, प्रा.मार्तंड कुलकर्णी , एनजीओ संगीता पाटील,पत्रकार गोकुळ भवरे ,राजेश पाटील
पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, य. च. मुक्त विद्यापिठाचे संयोजक प्रा. शिवदास बोकडे, सुरज आढागळे,प्रा.योगेश सोमवंशी, प्रा.सुलोचना जाधव प्रा.डॉ.शुभांगी दिवे, प्रा.मंदाकिनी राठोड, प्रा,लता पेंडलवाड, प्रा.धात्रक, प्रा.काझी प्रा..एस.आर .शिंदे , प्रा.स्वाती कुरमे तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्मचारी स्टाफ अधिकारी प्रितेश लोटे, राहुल दवने, मारोती पेंदोर, भीकुसींग चव्हाण, सुनिल राठोड, कस्तुरवार, संकेत वंजारे,बालाजी वानखेडे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी केले.

Copyright ©