Breaking News यवतमाळ सामाजिक

शासकीय रुग्णालय,बनले खाजगी रुग्णालय

’शासकीय रुग्णालय,बनले खाजगी रुग्णालय

शासकीय रुग्णालयात औषधिचा टुटवड़ा रुग्नांना बसतोय आर्थिक फटका

यवतमाळ:श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथे गेल्या काही महिन्यांन पासून औषधिचा टुटवड़ा पडलेला आहे.ज्यामुळे डॉक्टरांना सामान्यत सामान्य औषधि रुग्नांकडून बोलवाव्या लागत आहे.इतकेच नाही तर वार्डमधे लागणाऱ्या औषधि या लोकल परचेस कराव्या लागत आहे.ज्या रुग्नांची परिस्थिति नाही त्या रुग्नांना डॉक्टर ना विलाजाने सुट्टी देऊन घरी जाण्यास सांगतात शासकीय रुग्णालयात उपचार न झाल्याने रुग्णाला आराम नाही मिळत व रुग्नांला कर्ज बाजरी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. ज्यामुळे रुग्नांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे
सोबतच माहिती मिळाल्या नुसार रुग्णालयातील काही रक्त तपासणी केंद्र रात्रीचे वेळी बंद असल्याने डॉक्टरांना लागणाऱ्या महत्वाच्या रक्त चाचन्या रुग्नांना खाजगी रक्त तपासणी केन्द्रातुन करुण आनाव्या लागत आहे. ज्याचा रुग्नांना हजारो रूपयांचा फटका बसतोय डॉक्टर अशा काही तपासन्या खाजगी बड्या रुग्णालयामधुन करून घेत असल्याने येथील डॉक्टरांचे आर्थिक हित संबंध असल्याचे चर्चिल्या जात असल्याने हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालय हे जणू काही खाजगी रुग्णालयात बनल्या चां अनुभव येथे येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णांना होत आहे शासकीय रुग्णालयाची अवस्था हि खाजगी रुग्णालया सारखी झाली असल्याने शासनाच्या योजना केवळ कागदोपत्रीच राहणार का असा सवाल सर्वसामान्य करीत आहे

Copyright ©