यवतमाळ सामाजिक

दारव्हा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- काँग्रेस कमिटीची मागणी

दारव्हा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा- काँग्रेस कमिटीची मागणी
————————————
किन्ही(वळगी) दारव्हा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी- दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी सह काँग्रेस पक्षाची मागणी,
आज दि.२० जुलै रोजी दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी,शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस,ओ.बी.सी.सेल, अल्पसंख्याक सेल, महिला काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे आजी, माजी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने दारव्हा तालुक्यातील सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.दारव्हा तालुक्यातील सततच्या अति पावसामुळे शेतातील पिके खरडुन गेल्या मुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे.आधीच खरीप हंगामामध्ये पावसाचे उशीरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, आधीच शेतकरी हवालदिल होऊन कर्ज बाजारी झाला असता दुबार पेरणी साठी सावकारा कडुन कर्ज काढून शेतीची दुबार पेरणी करावी लागली,अशा नाजुक परिस्थितीत मध्ये गेल्या ७-८दिवसापासुन सततधार पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडुन गेली असुन व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील पिके पिवळी पडून सडायला लागली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे फार आर्थिक नुकसान होणार आहे.त्यासाठी दारव्हा तालुक्यातील शासनाच्या माध्यमातून तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करून दारव्हा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात देण्यात यावी.यासाठी उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री म.राज्य यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रकाश नवरंगे,सै.फारुक सै.करीम,शिध्दार्थ गडपायले, अतुल राऊत, अशोकराव चिरडे,रामधन जाधव, गजानन बिबेकर,अजय ठाकरे, जावेदखाॅ पठाण,उ-तमराव गोमासे,जगन पाटील, गुलाबराव राठोड, डॉ.दिलीप मिरासे, बाळकृष्ण भोयर, रामभाऊ ठाकरे,विजय गोकुळे, ज्ञानेश्वर खोडे,विजय पाचकोर, प्रमोद लोंढे, प्रविण जाधव, नरेश गुघाने, जितेंद्र महल्ले, अनिल लोथे, मधुकरराव राठोड, राजु अवचट, विनोद कानकीरड, शिवनारायण जयस्वाल, बाबाराव राऊत, शंकरराव तुपटकर, संदिप राठोड, पंडीत राठोड, किसनराव जठाळे, वसंतराव सवाई,संजय उघडे, अजाबराव पवार,संतोष फुसांडे,शेखर चौधरी,बबलु येवले,रोशन नवरंगे, साहेबराव जवके, नरेश गुघाने, गजानन डेरे, अतुल कुटे,सागर कोटमकार, हरसिंग चव्हाण, भाऊराव आडे, वसंतराव बोरचाटे, गजानन माने,अमोल ठाकरे सह काँग्रेस पक्षाचे आजी,माजी, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते,

Copyright ©