यवतमाळ सामाजिक

आशा गटप्रवर्तकांना थकीत मानधन पंधरा दिवसांत मिळणार — डॉ रामास्वामी आयुक्त आरोग्य सेवा

आशा गटप्रवर्तकांना थकीत मानधन पंधरा दिवसांत मिळणार — डॉ रामास्वामी आयुक्त आरोग्य सेवा

दि. १९ जुलै २०२२ रोजी आयटक संलग्न आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने आशा व गटप्रर्वतकांच्या तातडीच्या व प्रलंबित महत्वाच्या मांगण्याचे निवेदन मा. डॉ रामास्वामी एन आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक आरोग्य भवन मुंबई यानां देण्यात आले. यावेळी मागील ४ महिन्यांपासून थकित असलेल्या केंद्राच्या मोबदल्या संदर्भात व राज्य शासनाच्या मोबदला संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने मागणी करून देखील केंद्राकडून अजूनही निधी आलेला नाही. तरी याचा आरोग्य विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. १५ दिवसात जिल्हा पातळीवर आशा व गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यासाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन आयुक्त आरोग्य सेवा डॉ रामास्वामी एन यांनी दिले
तेपुढे म्हणाले गटप्रवर्तक यांना वेतन सुसूञीकरणात समाविष्ट करण्यासाठी आपल्या मागणी नुसार केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल . *गटप्रवर्तकांनी कार्यक्षेत्रात गेल्यावर लाईव्ह लोकेशन पाठविण्याची शक्ती होते* ही बाब मान्य नाही गटप्रवर्तक कार्यक्षेञात जावून काम करते की नाही हे बघण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( DCM) व तालुका समन्वय अधिकारी (BCM) यांची नेमणूक करण्यात आली आहे.ज्या जिल्ह्यात असे घडत असेलतर स्वतंत्र तक्रारी द्या असे डॉ रामास्वामी म्हणाले
आरोग्यवर्धिनी,मोबदल्यात ज्या उपकेंन्दात सि. एच. ओ नाहीत अशा वर्कर यांना मोबदला देण्यात यावे असे पञक काढण्यात येईल तसेच गावात अँलोप्फेटीक आयुर्वेदीक दवाखाने आहे वैद्यकीय अधिकारी बिएएमएस आहेत अशा ठिकाणी मोबदला देण्यासाठी जिल्हा स्तरावरुन प्रस्ताव येणे गरजेचे आहे तसेच सर्व आरोग्य केंद्रात सिएचओ भरण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय अधिकारी यांची आहे.
पेरणा प्रकल्प ,कोवीड लसिरण व हर घर दस्तक मोहीमांचा व इतर सर्व थकित मोबदल्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्य कार्यालय सकारात्मक असून आयटकने २५ जुलैचे आंदोलन करु नये अशी विनंती केली.आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी विनंती मान्य करीत पंधरा दिवसात थकीत मानधन व इतर प्रश्न सुटले नाहीतर ९ आँगस्ट कांती दिनी संपूर्ण महाराष्ट्रात आशा गट प्रवर्तक निषेध म्हणून जेलभरो करतील अशा इशारा दिला.
यावेळी राज्य आशा योजना राज्य कार्यक्रम व्यवस्थापक मा. स्वाती पाटील, यांच्या सोबतही चर्चा झाली स्वतः वित्त विभागा सहसंचालक यांच्या कडे घेवून गेल्या निधीची खरी परिस्थिती समजवून सांगितली. आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे (वर्धा) काँ ज्योती अंडरशहारे रेखा कोहाड (नागपूर ) सुनिता पाटील नयन गायकवाड (अकोला ) विठा पवार पौणिमा चुटे (गोंदिया) इत्यादीचा शिष्टमंडळात समावेश होता.अशी माहीती प्रशीध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे दिवाकर नागपुरे , राज्य उपाध्यक्ष , यांनी दिली आहे.

Copyright ©