यवतमाळ सामाजिक

महामार्गावर वृक्षरोपण मोहिमेचा प्रारंभ

महामार्गावर वृक्षरोपण मोहिमेचा प्रारंभ

यवतमाळ – महागाव ते बुटी बोरी पर्यंत वृक्षरोपण करुन राज्य महामार्ग हा सुशोभित करण्याचा प्रकल्प अंमलात आणल्या जात आहे. त्याचा प्रारंभ नुकताच भांबराजा येथील टोल नाक्याजवळ समारंभ पुर्वक करण्यात आला. या मोहिमे अंतर्गत जवळपास हजारो वृक्ष लावले जाणार आहेत. महागाव ते यवतमाळ पर्यंत 3 हजार पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि दिलीप बिल्डकॉन लिमिटेड कंपनीच्या वतीने वृक्षारोपण मोहमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय महामार्ग पोलीस विभाग तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते. या वृक्षरोपण मोहिमेचा प्रारंभ करतांना प्रकल्प अधिकारी प्रशांत पागृत, माजी पोलीस अधिकारी चंदनसिंह बयास तसेच महामार्ग कर्मचारी साहेबराव जुनघरे, संदीप, अक्षय, दर्शन, लखाणीजी, नाले साहेब, बनकर साहेब, योगेंद्र पाटील, मनोज श्रीवास्तव, धिरज चारपे, विरेंद्र जयस्वाल, राजेश कनन, राहुल बुटोला, बिपीन पटेल, मनोज जयस्वाल, सरपंच तसेच मनोहर मॅडम, अभिजीत मुरके, उपसरपंच हिवरी तसेच सन्माननिय नागरिक उपस्थित होते. दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या वतीने वृक्षरोपण मोहिमेबाबत जनजागृती केली जात आहे. मनोज जयस्वाल यांनी उपस्थितांचे आभार मानले. महागाव ते बुटीबोरी पर्यंत 60 हजार वृक्षरोपण करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला.

Copyright ©