यवतमाळ सामाजिक

दिग्रस येथे पतंजली योग समितीने गुरुपौर्णिमा उत्साहात केली साजरी

दिग्रस येथे पतंजली योग समितीने गुरुपौर्णिमा उत्साहात केली साजरी

श्री संत गजानन महाराज संस्थानचे लाभले मोलाचे योगदान

गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण आहे आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवप्रमाणे मानले जाते.म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरू पूजनदेखीलकेले जाते.भारतात अनेक शाळा,कॉलेज,आणि संप्रदायामध्ये देखील गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात आणि श्रध्दापूर्वक साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा चे ओचित्य साधून दिनांक १३-७-२०२२ ला पतंजली योग समिती दिग्रस तर्फे गजानन महाराज मंदिर बाजीराव नगर दिग्रस येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली याप्रसंगी पतंजलीचे दिग्रस तालुका प्रभारी (प्रशिक्षक) संजय रामराव निरपाशे यांनी आपल्या जीवनातील गुरुचे महत्त्व सांगताना ते म्हणाले आपल्या जीवनामध्ये गुरु आपल्याला ज्ञान व योग्य  मार्ग  दाखवितात ,गुरु हे आपल्या जीवनातील अंधार नाहीसा करून आपल्याला प्रकाशाकडे  नेतात ,गुरुनी सांगितलेले ज्ञान नेहमी  अंगीकारले पाहिजे, गुरु मुळे आपले जीवन बदलून जाते गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर चालल्यास जीवनाचे कल्याण होते, असे ते मार्गदर्शन करताना बोलत होते या प्रसंगी योग साधक व खालील मान्यवर उपस्थित होते. सुभाष परसराम अटक, राजेंद्र जी मात्रे, नारायण विष्णूपंत बेलगमवार, सुरेश मात्रे, दत्तात्रेय महल्ले, शिवाजी चौधरी, पुंडलिक जनार्दन उबाळे, लोमेश विठोलीकर,गावंडे महाराज, व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज, शालिनी राऊत, नंदा रामराव भोयर, उषा पातुर्डे, रेखा शरद खानझोडे, संध्या चौधरी, मीनाक्षी अटल, माधुरी किरण लाखेकर, वर्षा अडकिने, प्रेमीला महल्ले, किरण परमानंद वानखडे, विमलबाई लाखकर, सुशीला इकडे,अश्विनी निचत, रेखा राऊत,मीना मात्रे, संगीता गुघाने, राधाबाई गावंडे, देवकन्या नवलकर,सुलभा विटोलीकर,वासंती बोजेवार, कमल काळे,संगीता कोंडाण्य, प्रिया जोशी, कल्पना पवार, अरुणा खोडके,प्रतिभा पद्मावार,भारती बोरा, लीना संजय निरपासे,शकुंतलाबाई महल्ले, सरला खुरसडे, विजया चोपडे, व योग साधक उपस्थित होते

Copyright ©