यवतमाळ सामाजिक

साकीब शाह यांच्या उपोषणाची दखल उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशु केंद्र ची उपलब्धी

साकीब शाह यांच्या उपोषणाची दखल उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशु केंद्र ची उपलब्धी

उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे सुविधेच्या अभावामुळे अनेक नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला होता. साधनसामग्री उपलब्ध असतानाही डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेलोकांच्या जीवाशी खेळ चालू होता . याबाबत अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करूनही उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व स्थानिक आमदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. या सर्व बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता साकिबशाह जानुला शहा यांनी रक्तदान करून उपोषणाची सुरुवात केली आणि शासनाचे लक्ष वेधले. उपोषण हे नागरिक सुविधेसाठी व त्यांचे जीवन रक्षण करण्यासाठी असल्यामुळे पुसद येथील सामाजिक व राजकीय संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला होता. विशेष म्हणजे उपोषणाची दखल घेत तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा मुंबई तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक तरंग तुषार वारे मॅडम व केव्हाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावंत कुमार यांनी उपोषण करते साक्ष यांची प्रत्यक्ष भेट घेतली . उपोषणकर्त्यांच्या मागणी बाबत प्रत्यक्ष उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली व त्यानुसार आवश्यक त्या वरिष्ठ यंत्रणेशी संपर्क करून मागण्या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला .
तात्काळ काही मागण्या मंजूर करीत उर्वरित मागण्या पुरत ते संबंधाने पत्र दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली . उपोषण संपल्यानंतर सुद्धा सामाजिक कार्यकर्ते साकिब शाहयांनी उपजिल्हा रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ व संबंधित वरिष्ठ अधिकारी मंत्री महोदय यांच्याशी बोलून पाठपुरावा केल्यामुळे आज उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे सुविधा उपलब्ध झाले आहे .
नवजात बालकांना अतिदक्षता विभागाच्या सुविधा एसएससी उपलब्ध झाल्याने अनेक गोरगरीब जनता सुखावली आहे . नादुरुस्त एक्सप्रेस मशीन सुद्धा रुग्णांच्या सेवेत तत्पर झाली आहे .काही प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे . रक्त साठवणूक केंद्र लवकरच जन सुविधेसाठी मंजुरात झाले आहेत. यासह उपजिल्हा रुग्णालयंमध्ये रोडच्या बांधकामासह इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. या सुविधा सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक साकिबशाह यांच्या उपोषण प्रयत्न व पुढाकारातून उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या यशाबद्दल उपजिल्हा रुग्णालय प्रशासन व गोरगरीब जनतेकडून शहा यांचे आभार मानले जात आहे.
पुसद मतदार संघातील लोकांचे जीव वाचविण्यासाठी मी उपोषणाचा मार्ग अवलंबला. व या मागण्याच्या पूर्ततेसाठी राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख , तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे ,तत्कालीन आयपीएस अधिकारी सावंत कुमार ,तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी , पत्रकार यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आंदोलन यशस्वी झाल्याच्या प्रतिक्रिया नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता साकीब शहा यांनी व्यक्त केल्या.

Copyright ©