यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धरणावर पोलीस कर्मचारी नियुक्त करा

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धरणावर पोलीस कर्मचारी नियुक्त करा

यवतमाळ- सध्या पावसाळा असल्याने सर्वत्र पाऊस सुरू आहे, अशातच यवतमाळ जिल्यात असलेले सर्व धरण व निळोणा पूर्णतः भरून ओसंडून वाहत आहे, शहरातील व गावातील सुजाण नागरिक (पर्यटक) आपल्या परिवारातील सदस्यांना घेऊन धरण परिसरातील सोंदर्य पाहण्यासाठी व मोजमजेसाठी फिरायला जातात, अशातच तिथे शहरातील व गावातील हुलडबाजी करणारे टवाळखोर तरुण लंडळी देखील गर्दी करताना दिसून येते, लोकांन मध्ये आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी किंवा इतर कारणाने टवाळखोर तरुण मंडळी हुलडबाजी करतात व पाण्याने तुडुंब भरलेला धरणात पोहण्याच्या मनसोक्त आनंद प्रयत्न करतात, हा आनंद लुटताना दरवर्षी नकळत एकादी अप्रिय घटना घडून जाते, बऱ्याच वेळा जीवितहानी सुद्धा होते, महिलांन सोबत छेडखणीचे प्रकार सुद्धा घडतात, हया प्रकारे घटना जिल्ह्यात कुठेही नाही व्हावी, कुठे तरी आळा बसावा म्हणून, सर्व समाज सेवक संघटनां कडून पोलीस अधीक्षक कार्यलय येथे निवेदन देताना पोलीस विभागाला अशी मागणी करण्यात अली की आपल्या पोलीस विभागाकडून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व धरणावर पोलीस बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कर्मचारी नेमण्यात यावा हे निवेदन देते वेळी पर्यावरण संवर्धन विकास समिती व संकल्प फाऊंडेशनचे विनोद दोंदल, प्रशांत बोराडे, इको लव्हर गृपचे आशिष महल्ले, ऍड. मिलिंद गुल्हाने, निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे अर्पित शेरेकर इत्यादी अनेक संघटनेचे सदस्य उपस्थित होते,

Copyright ©