यवतमाळ सामाजिक

ना.तहसीलदारांची पत्रकारास धमकी प्रकरणी मारेगाव येथे निषेध

नागेश रायपूरे,मारेगाव

ना.तहसीलदारांची पत्रकारास धमकी प्रकरणी मारेगाव येथे निषेध
– संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई ची मागणी

– ग्रामीण पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांस निवेदन

ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार ओंकार चेके यांनी यवतमाळ येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका नायब तहसीलदाराच्या गलथान कारभारा विरोधात बातमी प्रकाशित करताच,त्यांना अजय गौरकार नामक ना. तहसीलदार यांनी भ्रमणध्वनी वरून धमकी दिल्या प्रकरणी या घटनेचा ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने निषेध करण्यात आला.व या वादग्रस्त ना.तहसीलदाराच्या संपत्तीची चौकशी करून पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत तत्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.तत्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

सध्या शैक्षणिक प्रवेशाची लगभग सुरू असून अनेक पाल्य व पालक प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रा सह त्उत्पन्नाच्या दाखला इतर दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाकडे धाव घेत आहे.विद्यार्थ्यांना संबंधित दाखले वेळेवर मिळत नसल्याने त्यांचा प्रवेशाचा मार्ग रोखल्या जात असल्याची ओरड विद्यार्थी ,पालक वर्गाकडुन होत होती.या प्रकरणी पत्रकार ओंकार चेके यांनी काही वृत्तपत्रांमध्ये ‘तहसील कार्यालयातील मनमानी कारभारामुळे पालक व विद्यार्थी त्रस्तअशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले.यावरून नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून दिनांक 12/7/2022 रोजी 12.31 वाजता संपर्क साधला असता, यावेळी नायब तहसीलदाराने ज्येष्ठ पत्रकार चेके यांना एकेरी शब्दात बोलतांनाच त्यांना अप्रत्यक्षपणे जिवे मारण्याची धमकी दिली. तु आत्ताच तहसील कार्यालयात ये,तुला मी सोडणार नाही, तुला पाहून घेईल,अशा पध्दतीची त्यांनी चेके यांना धमकी दिली.

ना. तहसीलदार गौरकार हे दाखल्यावर ऑनलाईन सही मुदतीत करत नाही,विद्यार्थी व पालकांशी उध्दटपणे वागत असल्याची ओरड होत असल्याने ते नेहमी वादग्रस्त ठरत आहे. गत कोरोना काळात दिग्रस येथील एक मिलिटरी सैनिकांला प्रवास पास साठी गौरकार नयांनी 1500 रुपयेची लाच मागितल्या प्रकरणी सुद्धा ucn केबल नेटवर्क ने बातमी प्रकाशित केली असता, गौरकार यांनी ucn प्रतिनिधी निनावे यांनासुद्धा जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा ची खोटी तक्रार देवून फसविण्याची धमकी दिली होती.

या वादग्रस्त व भ्रष्टाचार ना.तहसीलदार अजय गौरकार यांच्या संपत्तीची चौकशी करून यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव चे तालुका अध्यक्ष देवेंद्र पोल्हे, ज्योतिबा पोटे, नागेश रायपूरे,रमेश झिंगरे,अशोक कोरडे,उमर शरीफ,श्रीधर सिडाम, दिलदार शेख,पंकज नेहारे,सचीन मेश्राम, लहू जिवतोडे आदी उपस्थित होते.

Copyright ©