यवतमाळ सामाजिक

दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई,पिक,ऑप द्वारे पिकाची नोंद करण्याचे आव्हान,

अन्सार खान लाडखेड प्रतिनिधी ९४२२१९२६९१

दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई,पिक,ऑप द्वारे पिकाची नोंद करण्याचे आव्हान,

महाराष्ट्र राज्यात ई.पिक.पाहणी प्रकल्प हा १५ ऑगष्ट २०२१ पासून सुरु झालेला आहे आता स्वता शेतकरी बंधवांनी आपल्या शेतातील पिकाची नोंद आपल्या मोबाईल मधील.ई.पिक.पाहणी या ऑप द्वारे भरावे लागणार आहे ,मा जिल्हाधिकारी यवतमाळ व मा.उपविभागीय अधिकारी दारव्हा यांचे आदेशानुसार सर्व शेतकरी बांधवांना आवहान करण्यात आले आहे की आपन आपल्या शेता मधील पिकाची नोंद मोबाईल ऑप द्वारे स्वता बंधावर जाऊन करावी सदर नोंदणी करतांना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात असलेले उदा.विहीर,बोआरवेल,विविध जल सिंचना च्या स्त्रोता ची देखील नोंदणी करता येणार आहे शेतकऱ्यांनी या ऑप द्वारे पिकाची नोंद केल्या शिवाय शासनाच्या विविध योजना जसे प्रधानमंत्री पिक विमा योजना कूषि विभागाच्या योजनांच्या लाभा पासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी शेतकरी बांधवांनी मोबाईल ऑप द्वारे विहित मुद्दतित पिकाची नोंद करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आहवान दारव्हा तहसील चे तहसीलदार संजय जाधव यांनी प्रसद्धि पत्रकात केले आहे

Copyright ©