यवतमाळ सामाजिक

90 हजार किलोमिटर सायकलने प्रवास करुन स्वदेशीचा प्रचार करणारा तेस्वीर फोगाट यवतमाळात

90 हजार किलोमिटर सायकलने प्रवास करुन स्वदेशीचा प्रचार करणारा तेस्वीर फोगाट यवतमाळात

यवतमाळ – झिंझर हरियाणा येथील तेस्वीर फोगाट हा मागील 7 वर्षापासून आपले घरदार सोडून स्वदेशीचा संदेश घेऊन स्वताच्या सायकीलने भारत भ्रमण करीत आज यवतमाळ येथे दु. 12 वाजता यवतमाळ येथे पोहोचला. अवितरपणे सायकलने प्रवास करीत 90 हजार किलोमिटर सायकलने प्रवास करीत स्वदेशीचा प्रचार करीत एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवेश करत शाळकरी मुलांशी, ग्रामीण भागातील नागरीकांशी संवाद साधून स्वदेशीचा प्रचार करीत तेस्वीर फोगाट आज यवतमाळ येथे दाखल झाला. त्यांचे क्रिडा भारती सायकलींग ग्रुपच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल-श्रिफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रिडा भारती सायकलींग ग्रुपचे दिलीप राखे, डॉ. महेश मनवर, डॉ. हर्षल झोपाटे राजेश लोणकर, मनिष गुलवाडे, विजय बुंदेला, विशाल इहरे, अक्षय गावंडे प्रणय जैन नीता कुंटावार मॅडम पवन धोपेकर, अशोक दंडनाईक आदि याप्रसंगी उपस्थित होते. सात वर्षापूर्वी तेस्वीर फोगाट याने आपले घर सोडून पहिले तीन वर्ष हरियाणा, पंजाब, दिल्ली नंतरचे 2 वर्ष राजस्थान आणि उत्तराखंड तसेच मागील 2 वर्षापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये सायकलीने अनेक अडचणींना मात देत खडतर प्रवास करीत स्वदेशीचा प्रचार करुन देश सेवेचे व जनजागृतीचे व्रत अंगीकारले त्याबद्दल त्याचा क्रिडा भारती सायकलींग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©