यवतमाळ सामाजिक

पत्रकारांस धमकी देणाऱ्या नायब तहसीलदारावर कारवाही करा

पत्रकारास धमकी देणाऱ्या नायब तहसीलदारावर कार्यवाही करा

दिग्रस येथील पत्रकारांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर

सध्या शालेय कामकाज व इतर कामासाठी लागणारे दाखले जसे की, उत्पन्न, कास्ट व इतर दाखले देण्याची प्रक्रिया ऑनलाईन असताना नागरिकांना दिलेल्या वेळेत यवतमाळ तहसीलकडून न मिळाल्यामुळे अशातच यवतमाळ येथील काही नागरिकांनी सदर समस्या पत्रकार ओंकार चेके यांचे समोर मांडताच वृत्तपत्रामधून सदर बातमी प्रकाशित करण्यात आली. यामुळे नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी भ्रमणध्वनीवरून पत्रकार ओंकार चेके यांना प्रत्यक्षरीत्या धमकावून, मुस्कुटदाबी करण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या ‘त्या’ नायब तहसीलदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिग्रस येथील ग्रामीण पत्रकार संघ व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर लुकमान खान, पुरुषोत्तम कुडवे, सुनील हिरास, विलास निकम, लक्ष्मण टेकाळे, यशवंत सुर्वे, प्रफुल्ल व्यवहारे, धर्मराज गायकवाड, साजिद पतलेवाले, आकाश काशीकर, उमेश भटकर, सदानंद जाधव, किशोर कांबळे, जय राठोड, अनिल राठोड, कपिल इंगोले यांच्यासह ग्रामीण पत्रकार संघ व दिग्रस तालुका पत्रकार संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Copyright ©