यवतमाळ सामाजिक

वरुड भक्त येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

वरुड भक्त येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून मंगळवारी आर्णी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वरुड भक्त येथील अनेक घरात पाणी शिरून तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते.

आठवडाभरापासून आर्णी तालुक्यामध्ये कधी मुसळधार तर कधी अति मुसळधार पाऊस सतत सुरू असल्याने संपूर्ण जीवन विस्कळीत झालेले असतांना मौजे वरुड फक्त येथील बहुतांश घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून त्यांच्या घरातील अन्नधान्यांची नासाडी झाली तर जितेश पेंदोर यांचे कुडामातीचे घर कोसळून त्यांचे नुकसान झालेले आहे. या सर्व प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, तलाठी विकास सोनवणे आणि मंडळ अधिकारी सप्परवार यांनी करून सदरील घरांचे पंचनामे करून घेऊन तसा अहवाल तहसीलदार आर्णी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती आर्णी यांना सादर करण्यात आला असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले.

पुलाचे पुनर्बांधकाम करण्याची गरज

तसेच यावेळी गावाशेजारून वाहणार्‍या नाल्यातील टाकण्यात आलेले सिमेंट पाईप हे अरुंद असल्यामुळे पाऊस जास्त झाल्यास ते पाणी अडून ओव्हरफ्लोचे पाणी ग्रामस्थांच्या घरामध्ये जाण्याचा प्रकार प्रतिवर्षी घडतो आहे तेव्हा या पुलाचे बांधकाम पुन्हा होण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविणार असल्याची माहिती देखील ग्रामसेवक विजयकुमार यांनी दिली.

Copyright ©