Breaking News यवतमाळ

वादग्रस्त नायब तहसीलदाराची पत्रकारास धमकी

वादग्रस्त नायब तहसीलदाराची पत्रकारास धमकी

बातमी प्रकाशित केल्याने एनटी संतप्त

संभाषणाची ऑडीयो क्लिप व्हायरल

यवतमाळ, दि.१३ स्थानिक तहसील कार्यालयातील एक वादग्रस्त नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी काल मंगळवारी १२.३२ वाजता ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा एका स्थानिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओंकार चेके यांना भ्रमणध्वनीवरून धमकी दिली. या घटनेमुळे पत्रकार सृष्टीत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.

सध्या शालेय व महाविद्यालयीन प्रवेशाची घाई सुरू असल्याने अनेक पाल्य व पालक प्रवेशासाठी आवश्यक समजल्या जाणाèया उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाकडे धाव घेतात. या पाल्यांना असे दाखले वेळेवर न मिळाल्यास त्यांचा प्रवेशाचा मार्ग रोखल्या जातो व अनेकांना त्याचा मनस्तापही सहन करावा लागतो. स्थानिक तहसील कार्यालयात पाल्यांसाठी आवश्यक असलेले दाखले वेळेत मिळत नाही, अशी अनेक पालकांची ओरड सुरू आहे.या संदर्भात पत्रकार ओंकार चेके यांनी काही वृत्तपत्रांमध्ये ‘तहसील कार्यालयातील मनमानी कारभारामुळे पालक व विद्यार्थी त्रस्तङ्क अशा आशयाचे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त वाचल्यानंतर सदर कार्यालयातील नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी त्यांच्या ९२८४०६८९६३ या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवरून चेके यांच्याशी मंगळवारी १२.३१ वाजता संपर्क साधला. यावेळी नायब तहसीलदाराने सदर ज्येष्ठ पत्रकाराला एकेरी शब्दात बोलतांनाच त्यांना अप्रत्यक्षपणे जिवे मारण्याची धमकी दिली. तु आत्ताच तहसील कार्यालयात ये,तुला मी सोडणार नाही, अशा पध्दतीची त्यांनी चेके यांना  १.४ सेंंकदाच्या संभाषणातून अनेकदा धमकी दिली. गौरकार हे पाल्य व पालकांशी अंत्यत उध्दटपणे वागतात. दाखल्यासाठी विचारपुस करण्यास आलेल्या पाल्यांसोबत त्यांची वागणूक अंत्यत उर्मटपणाची आहे, अशा अनेक तक्रारी आहेत.

हा प्रकार अंत्यत गंभीर स्वरूपाचा आहे. गौरकार हे महसूल प्रशासनात एक वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची ही पुर्वपिठीका लक्षात घेता चेके यांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. या संपुर्ण प्रकारणाची महसूल प्रशासनाने वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून अशा वादग्रस्त अधिकाèयावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा याप्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघ आंदोलन छेडतील, असा इशारा सदर पत्रकार संघाने दिला आहे.

Copyright ©