यवतमाळ सामाजिक

नदीच्या पुराने हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली

नदीच्या पुराने हजारो हेक्टर शेतजमिनीवरील पिके पाण्याखाली

(पाण्याचा जोर कायम)
सावळी सदोबा-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील दातोडी,थंड,गुढा,वरूड,सावळी, चिमटा,खडका,कवठा, सुभाषनगर,सह बहुतांश गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली असून, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी येणारा घास नियती हिरावू पाहत असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहेत, त्यामुळे पिके चांगली होण्यासाठी पावसाने उघडझाप देण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे,मागील आठवडाभरापासून चालू असलेला पाऊस थांबण्याचा काही नाव घेत नाही आहे,सतत पाऊस येत असल्यामुळे परिसरातील पैनगंगा नदीसह अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊन अनेक शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेली असून,सोयाबीन तथा कापसाचे पीक सडण्याच्या मार्गावर आहेत,मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,अति पावसामुळे पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे,शिवाय उत्पन्नात घट येण्याची भीती सुद्धा शेतकऱ्यांना सतावत आहे,त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, त्यामुळे संबंधित विभागाने नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी सावळी सदोबा परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Copyright ©