यवतमाळ शैक्षणिक

सुसंस्कार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांचे सिल्वर झोन ओलंपियाड परीक्षेत यश

सुसंस्कार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांचे सिल्वर झोन ओलंपियाड परीक्षेत यश

सिंघानिया नगर स्थित सुसंस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी गणित ओलंपियाड सिल्वर मॅथ फाउंडेशन आयोजित परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. मुलांच्या बौद्धिक कल्पकतेला चालना मिळेल हा उद्देश लक्षात घेऊन ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत कॉम्प्युटर, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामान्य ज्ञान हिंदी व सामान्य विज्ञान या परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या परीक्षेत कॉम्प्युटर हा विषय घेऊन आराध्य चौधरी यांनी प्रथम पुरस्कार व सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच गणित हा विषय घेऊन इयत्ता पहिलीतील स्वरा गोडेकर सुवर्णपदक प्राप्त करून ओलंपियाड टॉपर म्हणून बहुमान मिळाला. तसेच भावेश गवळी इयत्ता दुसरी,चिराग चेके इयत्ता तिसरी, समर्थ तेजने इयत्ता पाचवी, ऋषिकेश चिंतावार इयत्ता सहावी या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. विज्ञान या विषयात इयत्ता पहिलीतील स्वरा गोडेकर, इयत्ता तिसरी पर्णवी बैद, इयत्ता चौथीतील उत्कर्ष जोल्हे, इयत्ता पाचवी मधील संस्कार काळे इयत्ता सहावीतील ऋषिकेश चिंतावर इयत्ता सातवीतील इशिता पावडे या सर्वांनी सुवर्णपदक , इयत्ता चौथीतील आराध्य चौधरी, इयत्ता पाचवीतील अंशुल काळे यांनी रजत पदक तसेच इयत्ता पाचवीतील अंशुल दंडे यांनी कांस्यपदक प्राप्त केले. इंग्रजी या विषयात इयत्ता पहिली स्वरा गोडेकर, पर्णवी भैद इयत्ता चौथी, आराध्य चौधरी इयत्ता पाचवी, अंशुल दंडे इयत्ता सहावी आदया पुंडशास्त्री या सर्वांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. सामान्य ज्ञान या विषयात इयत्ता चौथी आराध्य चौधरी,इयत्ता पाचवी अनुष्का दंदे यानी स्वर्ण पदक व इयत्ता चौथी आराध्या तम्मेवार याने रजत पदक प्राप्त केले. हिंदी विषयात इयत्ता सातवी दिव्या भांबेरे हिने सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच सामान्य विज्ञान या विषयात इयत्ता चौथी मधील खुशी राऊत हिने सुवर्णपदक प्राप्त केले.
शाळेचे सचिव श्री. के संजय सर व मुख्याध्यापिका उषा कोचे मॅम यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला व उत्तुंग यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले या यशात मनीषा उदार व सीमा राऊत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Copyright ©