यवतमाळ सामाजिक

प्रशासनास बालविवाह थांबविण्यात यश

प्रशासनास बालविवाह थांबविण्यात यश

यवतमाळ जिल्ह्यातील करळगाव ता. बाभूळगाव जिल्हा यवतमाळ या गावी अल्पवयीन बालकाचा बालविवाह होत असल्याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे माहिती विश्लेषक सुनील बोक्से यांनी तातडीने करळगाव ता. बाभूळगाव या गावी भेट देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ, व चाईल्ड लाईन १०९८ यवतमाळ यांना बालविवाह बाबत माहिती देण्यात आली. अल्पवयीन बालकाच्या कुटुंबास प्रत्यक्ष भेट देऊन बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व बालविवाह झाल्यास बाल विवाह प्रतीबंधक अधिनियम २००६ अंतर्गत शिक्षेस पात्र होऊ शकते अशी माहिती देण्यात आली.बालिकेच्या आई वडिलांकडून बालकाचा विवाह २१ वर्ष पूर्ण झालेनंतर विवाह करण्यात यावा असा जवाब लिहून घेण्यात आला व त्याप्रमाणे सुचना पत्र सुद्धा देण्यात आले. सदर बालविवाह थांबविण्यास ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ चे पोलीस उपनिरीक्षक-.अमोल ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक- सुजाता मनवर, सहा.पोलीस उपनिरीक्षक-रणजीत जाधव, पोलीस कर्मचारी-रुपेश नेवारे, चाईल्ड लाईन टीम मेंबर- दिलीप दाभाडेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे,माहिती विश्लेषक सुनील बोक्से, गावातील पोलीस पाटील,-प्रज्ञा बन्सोड, आशा वर्कर रंजना नाईक, याच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीस मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, यवतमाळ ग्रा चे पोलीस निरीक्षक किशोर जुंघरे यांचे मार्गदर्शना खाली हि कारवाई करण्यात आली.

Copyright ©