यवतमाळ सामाजिक

“प्लास्टिक निर्मूलन कायदा उपक्रमाचे “आयोजन

महाग़ाव कसबा प्रतिनिधी दिपक वागारे

“प्लास्टिक निर्मूलन कायदा उपक्रमाचे “आयोजन

स्थानिक शहीद भगतसिंग विद्यालय महागाव कसबा येथे दिनांक १ जुलै २०२२ ला प्लास्टिक निर्मूलन कायदा अंतर्गत मुलांना प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृतीसाठी उपक्रमाचे आयोजन शाळेतील आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आले होते .या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापरण्याचे दुष्परिणाम व भविष्यकालीन परिस्थिती यावर मार्गदर्शन व त्यावरील उपाययोजना सुचविण्यात आल्या. तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी आपल्या आजूबाजूला असणारा प्लास्टिक कचरा गोळा करून तो बॉटलमध्ये भरून त्या सर्व बॉटल शाळेत विद्यार्थ्यांनी गोळा केला.व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने एक नवे पाऊल उचलले. तसेच आम्ही जीवनात विनाकारण प्लास्टिक वापरणार नाही पिशव्यांचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करेल अशी प्रतिज्ञा घेतली. अशाप्रकारे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Copyright ©