महाराष्ट्र यवतमाळ

सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी श्रीमती कुंतलाबाई येरडलावार व्हाईस चेअरमन पदी पोचना आईटवार

सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदी श्रीमती कुंतलाबाई येरडलावार व्हाईस चेअरमन पदी पोचना आईटवार

(किनवट) दिनांक 10 जुलै 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय दुड्रा येथे सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळातून चेअरमन म्हणून श्रीमती कुंतलाबाई मुरारी येरडलावार तर व्हाईस चेअरमन म्हणून पोचना आईटवार यांची एकमताने निवड करण्यात आली सेवा सहकारी संस्था मर्यादित दुड्रा संचालक मंडळ निवड साठी 13 जागेसाठी 18 जणांनी अर्ज दाखल केला होता त्यापैकी दुड्रा ग्रामपंचायतचे सरपंच रामरेड्डी आईटवार, शंकर आईटवार, रामय्या तुमावार, केशव तोटावार, पोचना शेपूरवार या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने प्राध्यापक पुरुषोत्तम येरडलावार यांच्या गटाचे 13 पैकी 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले इतर मागास प्रवर्गातून साहेबराव इंगोले यांचे अर्ज फेटाळण्यात आले .बिनविरोध निवडून आलेले सदस्य म्हणून सर्वश्री मोहन सल्लावार, देवराव गोल्लेवार, गंगया तोटावार, संतोष इमडवार, भगवान तोटावार,वेणूगोपाल मारपवार, प्रकाश टिंगनवार, देवराव वाघमारे ,प्रा पुरुषोत्तम येरडलावार, सौ. प्रतिभा येरडलावार हे सेवा सहकारी सोसायटी संचालक पदी बिनविरोध निवडून आले .गेली 35 वर्ष स्वर्गीय. मुरारी येरडलावार यांचे सेवा सहकारी सोसायटीवर वर्चस्व होतं त्यांची पत्नी श्रीमती कुंतलाबाई मुरारी येरडलावार यांची चेअरमन पदी निवड झाल्याने पॅनल प्रमुख प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी सर्व संचालक मंडळाचे व उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचे व गावकऱ्यांचे आभार मानले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.आर. उसकेमवार, सहायक म्हणून सचिव महेश पारटकर यांनी काम पाहिले.

Copyright ©