यवतमाळ सामाजिक

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण

स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण

नगर पंचायत कळंब च्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्थानिक तहसील कार्यालय प्रांगणात रविवार दि. १० जुलै २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश काळे यांचे हस्ते विविध प्रकारच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक नागरिकांनी एक वृक्ष लावून जोपासले पाहिजे तरच पर्यावरण टिकु शकेल असे आवाहन श्री शैलेश काळे उपविभागीय अधिकारी यांनी व्यक्त केले. प्रदूषणाने हवा दुषीत होवून अनेक आजार वाढलेले आहे त्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण कार्यात सहभागी होऊन वृक्षारोपण करावे असे मनोगत श्री. सुनील चव्हाण तहसीलदार यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्याधिकारी श्री नंदु परळकर, प्रशासकीय अधिकारी सुनील मगर, नगराध्यक्षा श्रीमती अफरोज बेगम सिद्दीकी, बांधकाम सभापती श्री योगेश धांदे, गटनेता श्री चंद्रशेखर चांदोरे, स्वच्छता बॅण्ड ॲम्बेसेडर प्रशांत डेहणकर, नगरसेविका सौ. सुनिता प्रमोद निमकर, सौ. पंचशिला जगदीश भेले, श्री. चिंतामणी देवस्थान सचिव बसवेश्वर माहुलकर, कॉग्रेस कमेटी शहर अध्यक्ष सरोज अहमद सिद्दीकी, सामाजिक कार्यकर्ते संतोष विधाते सह नगरसेवक, तहसील कर्मचारी, न.पं. कर्मचारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे हस्ते पिंपळ, निम, वड, जांभूळ, करंज, सिताफळ, बेल, कवट, आवळा सह विविध वृक्षाचे मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Copyright ©