यवतमाळ सामाजिक

वाई हातोला येथे जुगारावर ग्रामीण पोलिसाची धाड, ३ जुगाऱ्याना अटक

वाई हातोला येथे जुगारावर ग्रामीण पोलिसाची धाड, ३ जुगाऱ्याना अटक

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत वाई हातोला येथे जुगार चालु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून पोलीसांनी सापळा रचून जुगार अड्यावर धाड टाकताच जुगार खेळणारे पळत असताना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तीन आरोपी सह ५,२९,६१० रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला यात तीन आरोपी ला अटक केली यात प्रशांत गणपत कत्तलवार, रा. पारवा,पंजाब बाबुलाल चव्हान,किशोर राठोड, रा. वाई, यांचे जवळून पाच मोबाईल चार दुचाकी, एक फोर व्हीलर स्वीपट इत्यादि वाहाणासह आरोपी यांना अटक केली इतर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील व डॉ.खंडेराव धरणे यांच्या आणि संपतराव मोतले पोलीस निरीक्षक किशोर जूनघरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक अशोक ढोकणे, पांडूरंग कवरासे, ज्ञानेश्वर मानकर इत्यादींनी हि कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Copyright ©