यवतमाळ सामाजिक

विविध संघटने मार्फत निषेध निवेदन देण्यात आले.

विविध संघटने मार्फत निषेध निवेदन देण्यात आले.

यवतमाळ – नुकताच चार पाच दिवसांन पासून यवतमाळ जिल्ह्यातील एका तालुक्यातील वन्यजीव निलगाईला काठीच्या साह्याने व कुत्र्याच्या मदतीने जीवे मारतानाचा अमानवीय व्हिडीओ सर्वत्र मोबाईल वर सम्पूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाला होता, हया घटनेला कुठेतरी आळा बसावा म्हणून वन्यजीव संरक्षण अधिनियम कार्यवाही झाली पाहिजे तसेच या पुढे या पद्धतीने कृत्य करणाऱ्या लोकांच्या मनात वचक निर्माण व्हावी म्हणून यवतमाळ मधील विविध संघटनेच्या वन्यजीव रक्षक, वृक्ष प्रेमी, समाज सेवक, पर्यावरण मित्र इत्यादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेचा निषेध म्हणून दि. ८/७/२०२२ ला निषेध निवेदन जिल्हाधिकारी म. अमोल येडगे तसेच वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अधिकारी वसंत घुले यांना देण्यात आले, लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले, हया वेळी विनोद दोंदल, संकेत लांबट, राहुल दाभाडकर, दिनेश तीवाडे, अर्पित शेरेकर, अनिकेत नवरे, प्रलय टीप्रमवार , निलेश मेश्राम, आशिष महल्ले, कमलेश बघेल, पंकज हेमणे, भूषण बगमारे, अभि बोरकर, छोट्या मेश्राम, अमोल क्षीरसागर, अजय वर्मा, संकल्प फाऊंडेशन, निस्वार्थ सेवा फाऊंडेशन, पर्यावरण संवर्धन व विकास समिती, एक हात मदतीचा वन्य जीवासाठी, वाईल्ड लाईफ कमिशन & रिचर्स, संकल्प आपुलकी, इको लव्हर गृप, MH29 हेलपिंग हँडस, धैर्य सोशल वे. फाऊंडेशन, इतर अनेक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

Copyright ©