यवतमाळ सामाजिक

पत्रकार शक्ती चे वृत्त प्रकाशित होताच दिग्रस पालिका प्रशासन खडबडून जागी झाली

पत्रकार शक्ती चे वृत्त प्रकाशित होताच दिग्रस पालिका प्रशासन खडबडून जागी झाली

दिग्रस नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष व घाण पसरवणाऱ्या काही लोकांच्या बेजबाबदार कृतीमुळे दिग्रस शहरातील नगरपालिकेच्या इमारतीचे सार्वजनिक शौचालयात रुपांतर झाले होते. या संदर्भात पत्रकार शक्तीने मंगळवारी पालिकेत प्रवेश केल्यानंतर लोक अंदाधुंदपणे लघवी करत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती, त्यानंतर गुरुवारी १६ जून रोजी पालिकेच्या तळमजल्यावर साफसफाई करून पालिका प्रशासन झोपेतून जागे झाले आणि शेड टाकण्यात आली. जेणेकरून लघवी करून घाण पसरवण्यासाठी येणाऱ्या लोकांचा मार्ग बंद होऊन त्यांच्या हालचालींना आळा बसेल.
बेजबाबदार कृत्याचा पर्दाफाश करून, प्रशासनाला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या पत्रकार शक्तीच्या बातमी ने स्थानिक पालिका प्रशासन केवळ पालिका हद्दीतच नव्हे तर शहरातील स्वच्छतेबाबत सतर्क झालेली दिसून येत आहे. गुरुवारी शहरातील रस्त्यांवरील कचरा, घाण हटवणे, रस्ते व महामार्गांची साफसफाई मजूर पथकासह जेसीबी मशिनच्या सहाय्याने प्रभावीपणे सुरू करण्यात आली

Copyright ©