यवतमाळ राजकीय

१२ वी परीक्षा मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

१२ वी परीक्षा मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

शहर काँग्रेस कमिटी, यवतमाळ वतीने , शहर काँग्रेसचे सरचिटणीस श्री अजय किन्हीकर यांच्या वाढदवसानिमित्त, इयत्ता १२ वी परीक्षा मध्ये विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन दिनाक: १५/६/२२ ला काँग्रेस कमिटी कार्यालय यवतमाळ येथे करण्यात आले, या वेळी जवळपास १०० विद्यार्थांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्रफुल मानकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये बाळासाहेब मांगुळकर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ तसेच मा. राहूलभाऊ मा. ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. मा. चंद्रशेखर चौधरी

माजी नगरसेवक ,गटनेते नगर परिषद यवतमाळ, व अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ
मा. उषाताई दिवटे माजी नगरसेवक नगर परिषद यवतमाळ, व अध्यक्षा महिला शहर काँग्रेस कमिटी यवतमाळ
.प्रियंकाताई बिडकर
उपाध्यक्षा यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्री.अजय किन्हीकर
सरचिटणीस यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी यांनी केले.
सूत्रसंचालन श्री आशिष महल्ले
सचिव यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी यांनी केले तर आभार सौ. दर्शनाताई लोकेश इंगोले
माजी नगरसेविका नगर परिषद यवतमाळ यांनी मानले.
कार्यक्रमाला.माजी नगरसेविका पल्लवीताई रामटेके, प्रलय टीप्रमवार,सृष्ठी दिवटे , श्वेता दिवटे,दत्ता हाडके, लाला तेलगोटे, अजय मैत्रेकर, डॉ. संदीप तेळगोटे,उदय सरताबे, आदी उपास्थित होते. समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत शहर काँग्रेस कमिटी ने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केल्या बद्दल सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Copyright ©