नागपूर सामाजिक

“विश्वात्मक औदार्य – रक्तपेढी एक वरदान” हे पुस्तक रक्तदात्यांसाठी समर्पित आमदार मदन येरावार यांच्या हस्ते पुस्तकाचे थाटात प्रकाशन

“विश्वात्मक औदार्य – रक्तपेढी एक वरदान” हे पुस्तक रक्तदात्यांसाठी समर्पित आमदार मदन येरावार यांच्या हस्ते पुस्तकाचे थाटात प्रकाशन

रक्तदाता खरा विर,खचलेल्यांना देई धिर ।।
१४ जुन जागतिक रक्तदाता दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी रक्तदान जनजागृती करुन नवीन रक्तदाते वाढावेत यासाठी प्रयत्न केले जाते.
यवतमाळ जिल्ह्यातील यशस्वी समाजसेवक म्हणून ओळखणारे युवा लेखक प्रफुल भोयर यांनी लिहिलेल्या विश्वात्मक औदार्य – रक्तपेढी एक वरदान या श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या रक्तपेढीची यशोगाथा सांगणारे पुस्तक जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदात्यांस समर्पित करण्यात आले.
प्रफुल भोयर यांनी रक्तदान क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करताना त्यांनी केलेला शासकीय रक्तपेढीचा अभ्यास आपल्या शब्दात शब्दबद्ध केला. त्याला सामाजिक पुस्तकाचे स्वरूप देऊन स्वखर्चाने छापून घेतले आणि यवतमाळ चे मानद आमदार श्री मदन येरावार यांनी त्यांच्या हस्ते 14 जून ला हे पुस्तक रुग्णसेवेसाठी रक्तदात्यांस समर्पित केले.
आपल्या राजकीय कामगीरीने नावाजलेले आमदार श्री येरावार साहेब यांच्या हस्ते पुस्तकाच्या प्रकाशनाने रक्तदानाचा संदेश तळागाळातल्या तरुणांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे एकतेचा आणि औदार्याचा संदेश घेऊन हे सदर पुस्तक मोठं यश प्राप्त करेल, अशी आशा आहे.
जिल्ह्यात उभारलेली रक्तदानाची चळवळ या पुस्तकामुळे अजून भक्कम होईल असा आशावाद रक्तदात्यांकडून व्यक्त होत आहे. यावेळी लेखक प्रफुल भोयर यांनी आमदार श्री मदन येरावार तसेच जिल्हा प्रशासन व प्रत्येक रक्तदात्यांचे आभार मानले.
यावेळी प्रशांत भाऊ यादव पाटील, राजुभाऊ पडगिलवार, आकाश धुरट, रेखाताई कोठेकर, मायाताई शेरे, वैशालीताई खोंड, विजय भाऊ खडसे, शंतनु भाऊ शेटे, अश्विन तिवारी, अश्विन बोपचे, शुभम चोरमले, स्मिताताई भोयटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Copyright ©