यवतमाळ सामाजिक

दिग्रस नगर पालिका इमारत परिसराचे चक्क मुत्रीघरात रूपांतर

दिग्रस नगर पालिका इमारत परिसराचे चक्क मुत्रीघरात रूपांतर

निर्लज्ज लोक दिवसाढवळ्या मूत्र विसर्जन करतांना न.पालिकेत महिला वर्ग आहे याचे सुद्धा भान ठेवत नाहीत

दिग्रस नगर पालिका प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षनामुळे नगर पालिका संकुलातीलच लोक दररोज लघवी करण्यासाठी नगर पालिका इमारती चा परिसर गलिच्छ करीत आहे . स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असा आव देणाऱ्या न.पालिकेत आजकाल “दिव्याखाली अंधार’ ही म्हण प्रत्यक्षात आणली जात आहे.पत्रकार शक्ती ने नगर पालिका इमारत परिसरात मनसोक्त लघवी करताना एका तरुणाला कॅमेऱ्यात कैद आहे. याठिकाणी दररोज लघवी करण्यासाठी ये-जा करणे नित्याचेच झाले आहे. थुंकणे आदी कृत्य करताना आढळून आल्यास 200 रुपये वसूल करण्याची कारवाई करण्याचा इशारा स्पष्ट दर्शनभागी लिहिलेला आहे. मात्र त्याच दर्शनभागी चौकटी खाली असंख्य मूत्र विसर्जनाचे ठिगळ दिसून येतात. येथील संधी पाहून पालिकेची इमारत घाण करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यांपासून रोखण्यास पालिका प्रशासन हतबल दिसून येत आहे .त्यामुळे पालिका प्रशासनानेच आपल्याच निष्काळजीपणावर आपआपल्या विभाची बाजू सांभाळत इतर विभागावर दोष देत संपूर्ण विषयावर पडदा टाकला जात आहे.

—————————————-
नगर परिषद संकुलातीलच दुकानदार लोक मूतारीचा वापर न करता निर्लज्जपणे असे कृत्य करतात .
१६-०४-२०२२ ला या संदर्भात बांधकाम विभागाला पत्र देऊन मागील रस्ता बंद करण्यात यावे असे सुचविले आहे मात्र त्यांचे उदासीन धोरण दिसून येत आहे

कैलास कलोसे
आरोग्य निरीक्षक न.प दिग्रस

————————————-
आरोग्य विभागाने पत्र नाही तर आवक जावक मार्फत अर्ज दिला आहे .मुख्याधिकारी गोहार साहेब आल्यानंतर त्यांची परवानगी घेऊन टिन पत्रा लावून मागचा रस्ता बंद करू
किशोर दरेकर
बांधकाम अभियंता न.प दिग्रस

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©