यवतमाळ सामाजिक

वटपौर्णिमेला करा पर्यावरणाचंही व्रत! वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी

वटपौर्णिमेला करा पर्यावरणाचंही व्रत! वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी

रोजी वट पौर्णिमेचे औचीत्य साधुन मनपुर गावात स्थानिक महिलांच्या हस्ते वट वृक्ष लावण्यात आले. तसेच वनविभागाने गावकऱ्यांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन याप्रसंगी वटवृक्षाचे मानवी जीवनामध्ये व आयुर्वेदामध्ये असलेले महत्त्व पटवून सांगितले. आगळ्यावेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली.

वडाचे झाड हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे या भव्य वटवृक्षाचा नाहक बळी जातो. त्यामुळे मैदानी परिसरात वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.
यावेळी कु.ए. एस. गेडाम वि. से. वनपाल अतिरिक्त कार्यभार मनपुर वर्तुळ, कु.पी. डी. दांडगे वनरक्षक मनपुर, विवेक आर. पांडे वनरक्षक अर्जुना, वनकर्मचारी ई.वाय.मिर्झा व .व्ही.बी.नेवारे,संयुक्त वन व्यवस्थापन समिती मनपुर चे अध्यक्ष विष्णूजी तडसे व सदस्य दिपक मडसे,MH 29 हेल्पिंग हँड चे बंडू खडके व जिवन तडसे आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Copyright ©