यवतमाळ सामाजिक

आमगाव (जंगली)व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांची पडझड रात्र काढावी लागली काळोखात

आकोली प्रतिनिधी सचिन चावरे

आमगाव (जंगली)व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांची पडझड रात्र काढावी लागली काळोखात

आकोली परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात जंगली आमगाव येथे घरांचे पत्रे उडाले.भिंतीला भेगा गेल्या यात ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.वादळ वारा प्रचंड वेगात असल्याने झाडाच्या फांद्या तोडून खाली कोसळल्या व विजेच्या तारा तुटल्या .त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून रात्र काळोखात काढावी लागली .विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला. पत्रे दूरवर जाऊन पडले . सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. वादळी वाऱ्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने येथील कुटुंब उघड्यावर आले.सध्या शेतीची कामं सुरू असून बी बियाण्याची वेवस्था करणे सुरू आहे.अशातच हा खर्च वेगळा. संकटांचे आभाळच कोसळले असून संसारोपयोगी साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे.कुटुंब जगवावे कसे, असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे पावसाने नुकसान केले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सरपंच कोल्हे यांनी तातडीने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून गोरगरिबांना शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©