यवतमाळ सामाजिक

” जननायक धरती आबा ‘बिरसा’ हेच इंग्रज विरोधी आंदोलनाचे अर्ध्वर्यू “- डॉ अनंतकुमार सूर्यकार

” जननायक धरती आबा ‘बिरसा’ हेच इंग्रज विरोधी आंदोलनाचे अर्ध्वर्यू “- डॉ अनंतकुमार सूर्यकार

श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरुळ ( तरोडा ) व जननायक बिरसा मुंडा स्मृती समिती तसेच गावकऱ्यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जननायक बिरसा मुंडा’ यांचा एकशे बावीसावा स्मृतिदिन स्थानिक तुकाराम महाराज सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला.
“भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत व ब्रिटिश विरुद्ध आंदोलनात भारतीय आदिवासी समाज नेहमीच अग्रणी राहिला आहे परंतु आदिवासी थोर महापुरुषांचा इतिहास हा भारतीयांसमोर कधी येऊच दिला नाही. या देशात इंग्रज शासनाच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन तत्कालीन कालखंडात आंदोलन म्हणजे काय असते ?हे जनतेसमोर आणण्याचे महत्कार्य जननायक ऊर्फ धरती आबा बिरसा मुंडा या क्रांतिकारकाने केले आहे. केवळ पंचवीस वर्षांचे आयुष्य मिळाले परंतु सर्व भारत त्यांना त्यांच्या कार्यामुळे सलाम करतो . गुरुदेव सेवा मंडळाचे ब्रिदच हे आहे की,” या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे”! या तत्त्वानुसार गावात विविध महापुरुष व संत माहात्म्यांच्या कार्यकर्तृत्वाचे विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येत असतात . ” असे विधान यवतमाळ तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संघटक डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी प्रसंगानुरूप केले.
प्रथम ” सामुदायिक प्रार्थना ” घेण्यात आली . प्रार्थनेनंतर डॉ अनंतकुमार सूर्यकार, विठ्ठल कोडापे, देवराव मेश्राम, भाऊराव वरठी यांनी बिरसा मुंडा व राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन केले . ज्ञानेश्वर कोडापे, महादेव तुमडाम, पवन उईके, गणेश सोनोने, ताराचंद चव्हाण, मारोती सलाम, योगेश कोडापे, प्रकाश कुमरे, रूपेश चव्हाण, शंकर मडावी, सचिन मेश्राम, जगदीश वरठी, दुर्गादास पुराम, गणेश धुर्वे, किशोर धुर्वे, अंकुश कुरसंगे, मयूर मडावी, मोनाल मडावी, मारोती उईके, गणेश बनकर, मोरेश्वर सराटे, रूंदा उईके,नबू उईके, प्रांजली उईके, अर्चना वलके यांनी स्मृतिदिन यशस्वी करण्यासाठी सहकार्य व परिश्रम केले घेतले.
मंत्रमुग्ध करणा-या ढेमसा वादनाच्या निनादात बस स्टॉपवर असलेल्या फलकाजवळ झेंडा रोहण करून शहीद बिरसा यांना अभिवादन करण्यात आले. शेवटी राष्ट्रवंदनेने स्मृतिदिनाची सांगता झाली.

Copyright ©