यवतमाळ सामाजिक

सावळा वागद सहकारी संस्थेत काँग्रेसचे वर्चस्व

सावळा वागद सहकारी संस्थेत काँग्रेसचे वर्चस्व

20 दिवसांपूर्वी झालेल्या सावळा वागद संस्था अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले तर एवढ्यातच संपले नसून आता सूत गिरणी बोरी अरब येथील निवडणुक तोंडावर असल्यामुळे प्रतिनिधी निवडनुकीत सावळा वागद संस्थेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस ने बाजी मारल्याचे दिसून आले हे शिवसेनेच्या आंतरिक वादामुळे घडल्याचे बोलल्या जात आहे गेल्या 2 वर्षांपासून लाडखेड जि. प. सर्कल मध्ये पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ते नवीन आलेल्या कार्यकर्त्यास महत्व देत असल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषद सदस्यांमार्फत कोणत्याही विकासकमांवर भर देण्यात आलेले नाही यामध्ये पुन्हा दीड वर्षपूर्वी झालेल्या सावळा ग्रामपंचायती पासून लाडखेड सर्कल शिवसेनेमध्ये खोडे गट व रवी गझलवार गट अशा दोन गटात रूपांतर झालेले आहे त्यामुळे शिवसेनेच्या हातातून अध्यक्ष पद व सभासद पद गेल्याची चर्चा आहे व यामध्ये होत असलेला वाद आता चव्हाट्यावर आल्याने या सर्कल मधील सेना मोडकळीस आल्याचे चित्र निर्माण झाले तर याकडे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आ.संजयभाऊ राठोड,जिल्हाप्रमुख आदी नेते हे लक्ष घालत नसल्यामुळे लाडखेड सर्कल शिवसेनेला खिंडार पडत असल्याची सेनेत चर्चा आहे सध्या गटबाजीचे पडसाद उमटत आहे शिवसेनेचा गड खाचन्याच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली असल्याने आपापल्या चुली वेगळ्या तर होणार नाहीं ना असा सवाल सैनिकांन कडून केल्या जात आहे.

Copyright ©