यवतमाळ सामाजिक

शेतकरी संघटना, स्वभाप चे प्रतीबंधीत कापूस बियाणे लागवड आंदोलन

शेतकरी संघटना, स्वभाप चे प्रतीबंधीत कापूस बियाणे लागवड आंदोलन

शेतकरी संघटना व स्वतत्रं भारत पक्ष, यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने खडकी तालुका राळेगाव येथे “एच टी बी टी ( तणरोधक) कापूस लागवड आंदोलन” दिनांक 12 जून 2022 ला दुपारी 12 वाजता राजेंद्र झोटींग यांचे ” ठेंगणी ” नामक शेतात आयोजित केले आहे. या वेळी “एचटीबिटी व जिएम” तंत्रज्ञानावर चर्चा करून एचटीबिटी कपाशीची लागवड करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप प्रमुख पाहुणे स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मधुसूदन हरणे, महीला आघाडी अध्यक्षा सौ प्रज्ञाताई बापट, युवा आघाडीचे सतीशभाऊ दाणी, राज्य कार्यकारिणी सदस्य विजयभाऊ निवल, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सोनालीताई मरगडे हे मार्गदर्शन करणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटिंग, प्रज्ञाताई चौधरी, दीपक अण्णा आनंदवार, बबन चौधरी, हिंमतराव देशमुख, चंद्रशेखर देशमुख, मनीष जाधव हे उपस्थित राहणार असून परिसरातील अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहे.
मागील 2008 पासून देशांमध्ये बीटी कापूस लागवडीस केंद्र सरकारने परवानगी दिली पण बिजी 2 नंतरचे तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरायला काँग्रेस च्या मनमोहनसिंग सरकारने तात्पुरती स्थगिती देऊन थांबविले होते. सरकार बदलले पण दिलेली स्थगिती मोदी सरकारने ही उठविली नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होऊन इतर देशातील शेतक-यांच्या 12 वर्षे मागे देशातील शेतकरी राहीला. आणी आज आत्महत्या करीत आहे.
केंद्र सरकार विदेशातून जिएम तंत्रज्ञानाचे बियाणे पासून तयार झालेले खाद्य तेल, दाळ, सोयापेंड आयात करून देशातील बाजारात विक्रीची परवानगी देते , पण हेच मोदी सरकार देशातील शेतक-यांना याच तंत्रज्ञानाने तयार झालेले एचटीबीटी, जिएम बियाणांची परिक्षणासाठी, लागवडी साठी परवानगी देत नाही, हा शेतक-यां सोबत विश्वासघात आहे. या दि 12 जून
2022 च्या आंदोलनातून राज्य सरकार आणि केंद्र शासनने एचटीबीटी, जिएम तंत्रज्ञानाचे बियाणे ला तातडीने परवानगी द्यावी व तंत्रज्ञान युकत शेती करण्याचे शेतक-यांचे स्वातंत्र बहाल करावे, या मागणी साठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आव्हान शेतकरी संघटनेचे जयवंतराव बापट, देवरावजी धांडे, चंद्रकांत देशमुख,बबनराव चौधरी, दशरथ पाटील, अविनाश पोळकट, देवेंद्र राऊत, भास्कर महाजन,अक्षय महाजन, गोपाल भोयर, इदरचंद बैद, दिपक अन्ना आंनदवार, हिम्मतवरा देशमुख, हेमंत ठाकरे, दशरथ खैरे, गणेश मुटे, सारंग दरणे, गजानन पारखी, अमोल जवादे, विठ्ठल खोंडे, गजानन कोल्हे, दशरथ काळे, गजानन ठाकरे, किसनराव पावडे, नारायण बोरकर,भास्कर पाटील, डॉ, श्यामसुंदर गलाट,विक्रम फटींग,कीशोर झोटींग, सूरेश आगलावे यांनी केले आहे.

Copyright ©