यवतमाळ सामाजिक

दिग्रस नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान

दिग्रस नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्या मुळे शेतकऱ्यांचे नुकसान

न्याय न मिळाल्यास शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

दिग्रस तालुक्यातील निंभा शेतशिवारात नगर पालिकेने १० एकर जमिनीवर करोडो रुपये खर्च करून सुध्दा बिना वाल कंपाऊन डम्पिंग ग्राउंड दिसून येत आहे. या बिना वाल कंपाउंडच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये शहरातील कचरा घंटा गाडीच्या साहाय्याने संकलन करून हजरो टन कचरा शहराबाहेर असलेल्या या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकला जातो.डम्पिंग ग्राउंडला वाल कंपाउंड नसल्याने तेथील कचरा शेतकऱ्याच्या शेतात आणि विहरित जात असल्याने मागील चार वर्षांपासून शेतकऱ्याला लाखोचे नुकसान होत असल्याने शेतकऱयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती .या तक्रारी ची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद ला तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश दिले असतांना सुध्दा कुठलीही दखल घेतली नसल्याने शेतकरी हिरा बाळापूरे,पुंडलिक थोरात,वंदना शिंदे याने वारंवार नगर परिषदेच्या चकरा मारून सुद्धा यावर उपययोजन न केल्यामुळे आज दि.०७ जून रोजी शतकऱ्याने डम्पिंगग्राउंड मध्ये येणाऱ्या कचरा गाड्या थांबवून डम्पिंग ग्राउंड ची सुधारणा करून न्याय मागण्यासाठी आंदोलन केले. न्याय न मिळाल्यास गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा त्रस्त शेतकऱ्याने दिला आहे.

Copyright ©