सावळी सदोबा:- आशिफ खान
सावळी बस स्थानकाची दुरवस्था:नागरीक तस्त्र
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजार पेठ असल्याने, सभोवतालच्या 43 गावांचा संपर्क या गावाशी असल्याने हे गाव मराठवाडा विदर्भाच्या टोकावर असल्याने,येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत असुन,मागील अनेक वर्षापासून या बसस्थानकाची देखभाल दुरुस्ती न झाल्याने,बसस्थानकाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी,पंखे तसेच रात्रीच्या वेळेस लाईटची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, बस स्टॉप ला दिलेली जागा एवढी जागा कदाचित विद्युत महावितरण कंपनीला एवढी जागा दिली असती तर नेहमी होणारी विद्युत समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली असती
Add Comment