बेला प्रतिनिधी कैलास साठवणे
बजरंग दल नागपूरच्या कार्यकर्त्यांनी गोमाताचे मास घेऊन जाणार ट्रक पकडला
नागपुर पिवळी नदी इथून गोमास भरून निघालेला ट्रक क्रमांक mh40 y 0163 बजरंग दलाच्या नागपूर चमूने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वर सकाळी साडेसहा वाजता ब्राह्मणी येथे पकडून बेला पोलीस ठाण्यात जमा केला बजरंग दल नागपूरचे शाखाध्यक्ष सागर जैस्वाल, रॉक्की महाजन , जोधराज सिंग , भूषण खुरसंगे रोहित कुकडे यांना गुप्त माहितीच्या आधारे खबर मिळाली की नागपुर पिवळी नदी इथून गोमास भरलेला ट्रक हैदराबाद कडे जाणारा होता, लगेच कार्यकर्त्यांनी ट्रकचा पाठलाग करणे सुरू केले त्या गाडीला पास करण्याकरिता mh31 8191 इंडिका सोबत होती महामार्ग क्रमांक 7 वरील ब्राह्मणी गावाजवळ ट्रकला अडविले ड्रायव्हरला विचारपूस केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, संशय बळावल्याने कार्यकर्त्यांनी ट्रक वर चढून ट्रकची पाहणी केली असता त्यात बर्फाने झाकून असलेल्या ताडपत्रीत संपूर्ण ट्रक भर गोमास असल्याचे दिसले, लगेच कार्यकर्त्यांनी पोलिसांना फोन वर माहिती दिली पोलिसांनी लगेच ट्रापिक पोलीस राजू राठोड व प्रवीण नैनवर हे घटना स्थळी पोचहून आपली सूत्रे हलवत ट्रक ड्रायव्हर शेख मोहत्ता सिम इमामबत वय32 , कामठी आणि इतर तीन आरोपींना मोहम्मद अब्दुल रहमत वय 50, नाजीर प्यारेखान वय 32, रितेश विजय करंडवार वय 34 याना ताब्यात घेतले, गोमासाचा ट्रक पकडलेची माहिती कळताच बेला पोलीस ठाणे पुढे लोकांची गर्दी उसळली आरोपींना ताब्यात द्या त्यांना सोडू नका अशी ओरड लोकांकडून झाली, पोलिसांनी समयसूचकता दाखवत ट्रक सहित सर्वांना ताब्यात घेतले, ट्रक क्रमांक MH40 y 0163 असा या ट्रक चा नंबर असून हा नंबर सुद्धा खोटा असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले,
नागपुर वरून नेहमीच गोमसाची विक्री होत असल्याचे ट्रक ड्रायव्हर यांनी सांगितले , लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवरती भा द वि कलम 5अ, 5क, 9क, 429 प्राण्यांचा छळ अधिनियम 1906 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास बेला पोलीस स्टेशनचे अधिकारी ठाणेदार पंकज वाघोडे करीत आहे ,
Add Comment