संपादक सदानंद जाधव
क्रूझर व दुचाकीच्या अपघातात १ ठार तर १ गंभीर जखमी दिग्रस येथील मोक्षधाम मधील रोड वरील घटना
दिग्रस येथील मोक्षधाम मधील बनलेल्या आर्णी बायपास रोडवर चारचाकी वाहन क्रूझर व दुचाकी वाहन पॅशन ची समोरा समोर धडक झाल्याने दुचाकी वरील
एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२५ मे २०२२ रोजी रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान घडली.
ढाणकी बिटरगाव येथून लग्नाचे वराती घेऊन दिग्रसकडे येत असणारी क्रूझर क्र.एम एच २९ बी सी ६६५४ ने दिग्रस मोतीनगर कडे जाणाऱ्या फॅशन दुचाकी क्र.एम एच २९ यु ७६२७ ची समोरासमोर जबर धडक होऊन यात दुचाकी वरील दोन्ही इसम गंभीर जखमी झाले असल्याने उपस्थित नागरिकांनी जखमींना आरोग्यधाम हॉस्पिटल येथे याकूब खान हारून खान (वय -३५ ) रा. मोतीनगर ,दिग्रस याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सलीम खान बाबा खान ( वय- ३४) रा. मोतीनगर ,दिग्रस यांना दिग्रस ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
…………………………………….
दिग्रस येथील मोक्षधाम मधील रोडवरील क्रूझर व दुचाकीच्या सामोरा समोरील अपघातातील क्रुझर हे वाहन पोलीस ठाण्यात चालकाने लावून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून रस्ता सुरळीत केला.
Add Comment