यवतमाळ सामाजिक

चाकूच्या धाकावर ट्रक लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

चाकूच्या धाकावर ट्रक लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत करळगाव घाटात फिर्यादी शेख फिरोज शेख मोहम्मद वय 48 वर्षे राहणार भोसा यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला होता यात ट्रक क्रमांक एम एच 29 एम 0833 धामणगाव रेल्वे येथून यवतमाळ कडे येत असताना करळगाव घाटामध्ये 23 मे 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता च्या दरम्यान त्याचे ट्रक च्या समोर चार ते पाच झनआडवे होऊन अडविण्यात आला होता आरोपी हे फिर्यादी जवळ आले व त्यांनी चाकूचा धाक दाखवून पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी यांनी चाकू मारून जखमी केले व त्यांच्या जवळील जबरदस्तीने चार हजार रुपये पाचशे हिसकावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती ही घटना करळगाव घाटातील मामा च्या ढाब्यावर गोंधळ घालून धाबा चालकासहि गळ्यावर हातावर चाकू मारून गंभीर जखमी केले करण्यात आले होते व त्यांच्याकडूनही जबरदस्तीने पैसे घेऊन गेले सरकारी दवाखाना यवतमाळ येथे सुद्धा येथील आरोपी यांनी 2000 हजार रुपये व एक मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला त्यातील आरोपी नामे गोलू उर्फ पूर्वज रमेश पारधी व 28 राहणार पुनर्वसन विकी शरदराव बगमारे वय 29 वर्षे राहणार यवतमाळ दर्शन राजीव ढोरे वय 27 वर्ष राहणार यवतमाळ यांना अटक करण्यात आली असून आरोपी माळीपुरा अभिषेक प्रकाश मस्के वय 25 वर्षे राहणार यवतमाळ हे फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यवतमाळ खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक,तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुंनघरे अवधूत वाडी पोलीस स्टेशनचे स्थानिक शाखे गुन्ह्याचे पोलीस अधिकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहे

Copyright ©