यवतमाळ सामाजिक

संघटनेच्या बळावर आपण बरेच काही प्राप्त करू शकतो दिनेश मडावी

संघटनेच्या बळावर आपण बरेच काही प्राप्त करू शकतो दिनेश मडावी

पांढरकवडा : समाज संघटन अत्यंत महत्वपूर्ण असून संघटनेच्या बळावर आपण बरेच काही प्राप्त करू शकतो असे अखिल भारतीय परधान समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश मडावी यांनी सांगितले ते स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते परधान समाजाला आपला इतिहास व संस्कृतीचा विसर पडत चालला आहे तो गौरवशाली इतिहास व संस्कृतीचे जतन करण्यासाठी समाज संघटना व प्रबोधन गरजेचे आहे असे ते म्हणाले यापूर्वी परधान समाज संघटनेचे कार्यकारणी गठीत करण्यात आली होती परंतु परधान समाज संघटनेचे काही पदाधिकारी निष्क्रिय निघाले ते घरी बसूनच संघटना वाढविण्याच्या गोष्टी करीत राहिले परंतु परधान समाज संघटना मजबूत करू शकले नाही. म्हणून सदर संघटनेचे पद रद्द करण्यात येत आहे आता पुन्हा एकदा नव युवकांना घेऊन परधान समाज संघटनेचे नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे व संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे आज पर्यंत आदिवासी समाजावर नेहमीच अन्याय अत्याचार होत आहे त्यामुळे सर्व समाजातील आदिवासी बांधवांची मोड बांध हुन येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जो पक्ष आदिवासी समाजाच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवेल आम्ही त्याचे समवेत राहुल अन्यथा आदिवासी समाजाची ताकद दाखवून देऊ असे ते पुढे बोलताना म्हणाले यावेळी आमदार अशोक उईके ,प्राध्यापक विनायक तुमराम, अमोल मंगाम, लखन मेश्राम पवन कुडमेते आदी उपस्थित होते

Copyright ©